तरुण शेतकऱ्यांनो, उद्यमशील शेती करा : भाले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 04:44 AM2020-12-17T04:44:23+5:302020-12-17T04:44:23+5:30
कुलगुरू डॉ. विलास भाले पुढे म्हणाले, सध्या विद्यापीठाने अनेक नवीन वाण संशोधित केले असले तरी निसर्गाचा लहरीपणा, पिकांवरील विविध ...
कुलगुरू डॉ. विलास भाले पुढे म्हणाले, सध्या विद्यापीठाने अनेक नवीन वाण संशोधित केले असले तरी निसर्गाचा लहरीपणा, पिकांवरील विविध प्रकारची कीड-रोग आणि शेतातील उत्पादनाला मिळत असलेला कवडीमोल बाजारभाव यामुळे शेतकऱ्यांचे अर्थचक्र दुष्टचक्र बनले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या कच्च्या मालापासून तयार करण्यात येणाऱ्या सीएनजी आणि पीएनजी युनिटची पातूर तालुक्यातील नवेगाव येथे होत असलेली उभारणी शेतकऱ्यांना सक्षम बनविणारा आणि रोजगाराची आणखी घडवणारा प्रकल्प निश्चितच दिशादर्शक ठरेल. त्यामुळे शेतकऱ्यांनी उद्यमशील शेती करणे काळाची गरज आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शीलाबाई प्रोड्युसर संघटनेचे संचालक छगन राठोड यांनी केले. कार्यक्रमाला ज्ञानेश्वर दास महाराज, जि.प. उपाध्यक्ष सावित्रीबाई राठोड, पं.स. सभापती लक्ष्मीबाई डाखोरे, पं.स. सभापती अनंत लव्हाळे, गटशिक्षणाधिकारी यू. एल. घुले, चान्नी पोलीस स्टेशनचे ठाणेदार राहुल वाघ, प्रकल्प अधिकारी समाधान राठोड, पातूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती चरणसिंग चव्हाण, शेकापूर ग्रामपंचायतीचे उपसरपंच हिरासिंग राठोड, जनार्दन डाखोरे, माणिकराव जाधव आदी उपस्थित होते. यावेळी कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भातील शेकडो शेतकरी उपस्थित होते. (फोटो)