कोरोनावर मात करणाऱ्या युवकाने दोनदा दिला प्लाझ्मा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:23 AM2021-04-30T04:23:20+5:302021-04-30T04:23:20+5:30

पातूर तालुका विकास मंचच्या ठाकूर शिवकुमारसिंह बायस यांनी यांना सकाळी नेहमीप्रमाणे एक फोन आला. माझी आई कोरोनाने आजारी आहे. ...

The young man who defeated Corona gave plasma twice! | कोरोनावर मात करणाऱ्या युवकाने दोनदा दिला प्लाझ्मा!

कोरोनावर मात करणाऱ्या युवकाने दोनदा दिला प्लाझ्मा!

Next

पातूर तालुका विकास मंचच्या ठाकूर शिवकुमारसिंह बायस यांनी यांना सकाळी नेहमीप्रमाणे एक फोन आला. माझी आई कोरोनाने आजारी आहे. माझी परिस्थिती खूप बिकट व हलाखीची आहे. माझ्याकडे रेमडेसिवीर इंजेक्शन खरेदी करण्यासाठी पैसे नाहीत. कृपया माझ्या आईला वाचवा... तिच्या शिवाय या जगात माझं कुणी नाही...एक युवक बोलत होता...त्याचे शब्द काळजाला चिरणारे होते. बायस यांना, त्या युवकाने बी पॉझिटिव्ह प्लाझ्मा उपलब्ध करून देण्याची विनंती केली. त्याची विनंती मान्य करीत ठाकूर शिवकुमारसिंह बायस यांनी स्वतःचा प्लाझ्मा देण्याचे ठरविले. दोन आठवड्या अगोदरच त्यांनी प्लाझ्मा दान करून एका मित्राचे प्राण वाचवले होते. यावेळीही परत त्यांनी प्लाझ्मा दान करून त्या युवकाच्या आईला जीवनदान देण्याचा प्रयत्न केला आहे.

त्यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

फोटो:

Web Title: The young man who defeated Corona gave plasma twice!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.