प्रभाग २ मध्ये युवा वॉरियर्स शाखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 04:36 AM2021-02-21T04:36:14+5:302021-02-21T04:36:14+5:30

शिवसेना वसाहतीमध्ये शिवजयंती अकाेला : जुने शहरातील शिवसेना वसाहतमधील वीर भगतसिंग नगरमध्ये प्रत्येक चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती ...

Young Warriors Branch in Ward 2 | प्रभाग २ मध्ये युवा वॉरियर्स शाखा

प्रभाग २ मध्ये युवा वॉरियर्स शाखा

Next

शिवसेना वसाहतीमध्ये शिवजयंती

अकाेला : जुने शहरातील शिवसेना वसाहतमधील वीर भगतसिंग नगरमध्ये प्रत्येक चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी नगरसेवक अमोल गोगे, दिलीप मिश्रा, डॉ. संजय ढोरे, हेमंत शर्मा, सुनील बाठे, अभिषेक भगत, अमोल मोहकर, सुभाष वर्मा, कुणाल डोईफोडे, अमर तळोकार, नवीन गोगे, गजानन घाटे, संतोष आखरे आदी उपस्थित होते.

प्रभाग ६ मध्ये शिवजयंती उत्सव

अकाेला : शहरातील प्रभाग क्रमांक ६ मध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली. तसेच युवा वाॅरियर्सच्या शाखेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी महापाैर अर्चना मसने, आमदार गोवर्धन शर्मा, आमदार रणधीर सावरकर, महानगराध्यक्ष विजय अग्रवाल, युवा वाॅरियर्सचे अध्यक्ष शिवम ठाकूर, शिवा सारवान, अविनाश पथरोध, उत्सव खिरवाल, शुभम थोटांगे, प्रतीक आर्वीकर, सिद्धेश सपकाळ, एकलव्य गनगणे आदी उपस्थित हाेते.

बाजारात गर्दी; नियमांचे उल्लंघन

अकाेला : जिल्हा प्रशासनाने जमावबंदी आदेश लागू केल्यानंतरही शहरातील बाजारपेठेत नागरिकांची गर्दी दिसून येत आहे. काेराेनाची लागण टाळण्यासाठी साेशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन केले जात नसल्याचे चित्र असून, यामुळे काेराेनाचा प्रसार हाेण्याची दाट शक्यता आहे. नागरिकांनी नियमांचे पालन करण्याचे आवाहन मनपा प्रशासनाने केले आहे.

वातावरणात बदल; साथराेग बळावले

अकाेला : मागील तीन दिवसांपासून वातावरणात अचानक बदल झाला आहे. गुरूवारी रात्री शहराच्या विविध भागात पावसाच्या हलक्या सरी काेसळल्या. या बदललेल्या वातावरणामुळे साथराेग बळावले असून, लहान मुले, वयाेवृध्द नागरिक आजारी पडण्याच्या प्रमाणात वाढ झाल्याचे शहरातील खासगी रुग्णालयात दिसून येत आहे.

रस्त्यांची झाडपूस नाहीच!

अकाेला :महापालिका आयुक्त निमा अराेरा यांनी साफसफाईच्या कामांकडे लक्ष देणार असल्याचे स्पष्ट केले हाेते. स्वच्छता व आराेग्य विभागाने आयुक्तांची भूमिका लक्षात घेता, शहरातील सर्वच प्रमुख व अंतर्गत रस्ते, बाजारपेठ, सार्वजनिक जागांची नियमित साफसफाई करणे अपेक्षित आहे. मात्र, तसे हाेत नसल्याचे दिसत असून, रस्त्यांची झाडपूस केली जात नसल्याचे समाेर आले आहे.

नाले, गटारे तुंबली

अकाेला : मनपाच्या आस्थापनेवरील सफाई कर्मचारी व खासगी सफाई कर्मचाऱ्यांना प्रभागातील नाले, सार्वजनिक जागा, रस्त्यांची साफसफाई करण्याची जबाबदारी साेपविण्यात आली आहे. परंतु, सफाई कर्मचाऱ्यांवर मनपाच्या आराेग्य निरीक्षकांचे नियंत्रण नसल्यामुळे कर्मचाऱ्यांनी साफसफाईकडे पाठ फिरवल्याने नाले, गटारे तुंबल्याचे दिसून येत आहे.

पथदिवे बंद; नागरिक त्रस्त

अकाेला : शहरात माेठा गाजावाजा करून एलइडी पथदिवे उभारण्यात आले आहेत. हद्दवाढ क्षेत्रातील पथदिव्यांचे टायमर बिघडल्याने पथदिवे रात्री बंद तर दिवसा सुरू राहात असल्याने नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागत आहे. या प्रकाराकडे मनपाच्या विद्युत विभागासह कंत्राटदाराचे दुर्लक्ष हाेत आहे.

रस्त्यांवर अनावश्यक गतिराेधक

अकाेला : शहरातील मुख्य रस्ते तसेच प्रभागांमधील गल्लीबाेळात जागाेजागी गतिराेधक बसविण्यात आले आहेत. नागरिक स्वखर्चातून घरासमाेर गतिराेधक उभारत आहेत. यामुळे वाहनचालकांना शारीरिक त्रास सहन करावा लागत असून, मनपाने तातडीने अनावश्यक गतिराेधक हटविण्याची मागणी हाेत आहे.

Web Title: Young Warriors Branch in Ward 2

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.