तुरीचे भाव गेले १0 हजार रुपये क्विंटलवर!

By admin | Published: August 16, 2015 11:52 PM2015-08-16T23:52:50+5:302015-08-16T23:52:50+5:30

जेवणामध्ये डाळीचाआस्वाद होणार महाग !

Your price has gone up to 10 thousand rupees quintal! | तुरीचे भाव गेले १0 हजार रुपये क्विंटलवर!

तुरीचे भाव गेले १0 हजार रुपये क्विंटलवर!

Next

अकोला : तुरीचे भाव अचानक वधारले असून, १0 हजार रुपये क्विंटलप्रमाणे बाजारात खरेदी सुरू आहे. तुरीचे भाव वधारल्याने तूर डाळीच्या दरात प्रतिक्विंटल १0 ते १२ हजार रुपयाची वाढ झाली आहे. यामुळे गरीब, सामान्य लोकांना जेवणामध्ये डाळीचा आस्वाद घेणे कठीण झाले आहे. देशात गरजेएवढे तुरीचे उत्पादन होत नसल्याने डाळवर्गीय पिकात तुरीचे उत्पादन वाढविण्यासाठी भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या डाळवर्गीय उत्पादन संचालनालयाने या पिकाच्या लागवडीवर भर दिला आहे. या डाळीत प्रोटीनचे प्रमाण अधिक असल्याने ग्रामीण, आदिवासी भागातील जनतेला तूर डाळ मिळण्यासाठी बिल गेटस फाउंडेशनने देशातील काही विद्यापीठांना निधी उपलब्ध केला होता. यात अकोल्याच्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठालाही निधी उपलब्ध करू न दिला होता, असे असले तरी आजमितीस देशात तुरीचे एकूण क्षेत्र हे ३९ लाख हेक्टर क्षेत्रापर्यंत पोहोचले आहे. महाराष्ट्रात हे क्षेत्र ११ लाख हेक्टर आहे. पण उत्पादकतेचे प्रमाण कमी आहे. देशातील तुरीच्या डाळीची गरज भागविण्यासाठी या डाळीची आयात ब्रह्मदेशातून करण्यात येत आहे. दरम्यान, सध्या तुरीचा पुरवठा कमी झाला असून, मागणी मात्र वाढल्याने तुरीच्या भावात विक्रमी वाढ झाली आहे. अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मागीलवर्षी ऑगस्ट महिन्यात तुरीचे भाव ४३00 रुपये प्रतिक्विंटल होते. यंदा सुरुवातच साडेसहा हजार रुपये क्विंटलने झाली. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला ही वाढ ७ हजार ते ८ हजार ७00 पर्यंत पोहोचली होती, तर १४ ऑगस्ट रोजी हे दर ९,२00 रुपयांच्यावर पोहोचले होते. दरम्यान, तुरीचे दर अचानक वाढल्याने तूर डाळीच्या दरातही वृद्धी झाली असून, तूर डाळीचे प्रतिक्विंटल भाव आजमितीस १0 ते १२ हजार रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. या दरवाढीमुळे गोरगरीब, सामान्याच्या आहारातून तूर डाळ बाद झाली आहे.

*डाळीचे उत्पादन घटले!

           मागील वर्षी अल्प पावसाचा फटका बसल्याने तुरीचे उत्पादन घटले आहे. केवळ कर्नाटक राज्यात चांगले उत्पादन झाल्याने आजपर्यंत देशात भाव स्थिर होते. मागणी वाढली असून, पुरवठा कमी आहे. आता विदेशातील दोनच कंपन्यांकडे तूर आहे.

Web Title: Your price has gone up to 10 thousand rupees quintal!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.