तुमचा सेल्फी आता पोस्टाच्या तिकिटावर

By admin | Published: August 11, 2016 01:37 AM2016-08-11T01:37:01+5:302016-08-11T01:37:01+5:30

पोस्टाची ‘माय स्टॅम्प’ योजना सुरू; ३00 रूपयांत १२ तिकिटे मिळणार!

Your selfie now on the ticket to the post | तुमचा सेल्फी आता पोस्टाच्या तिकिटावर

तुमचा सेल्फी आता पोस्टाच्या तिकिटावर

Next

हर्षनंदन वाघ
बुलडाणा, दि १0 : आतापयर्ंत फक्त महान लोकांचे फोटो त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आपण पोस्टाच्या तिकिटावर पाहिले आहेत. त्यात काही महान जिवंत व्यक्ती अपवाद आहेत. पण आता तुम्हीही तुमचा फोटो पोस्टाच्या तिकिटावर छापू शकता. त्यासाठी तुम्हाला केवळ ३00 रुपये मोजावे लागणार असून, बुलडाण्यात माय स्टॅम्प नावाची ही योजना सुरू झाली.
ह्यमाय स्टॅम्पह्ण नावाची ही योजना देशभर राबवण्याचा निर्णय टपाल खात्याने घेतला आहे. नागपूर शहरापासून या योजनेची सुरुवात झाली असून, बुलडाण्यात मुख्य डाकघर तसेच चैतन्यवाडी डाकघर येथे ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासाठी तुम्हाला पोस्टात एक छापील फार्म भरावा लागेल. सोबत ३00 रुपये आणि तुमचा एक फोटो द्यावा लागेल. तुम्ही जर फोटो सोबत आणला नसेल तर संबंधित विभाग तुमचा फोटो काढेल. १0 मिनिटांत तुम्हाला तुमचा फोटो असणारी १२ तिकिटे मिळतील. काश्मीरपासून कन्याकुमारीपयर्ंत देशात कुठेही टपाल पाठवण्यासाठी हे तिकीट तुम्ही वापरु शकता. याचबरोबर तुम्हाला संस्था, इमारत, लोगो, पाळीव प्राणी, पक्षी यांचाही फोटो छापू शकता येणार आहे. पोस्टाच्या तिकिटाचे डेफीनेटीव्ह आणि स्मारक असे दोन प्रकार आहेत. डेफीनेटीव्ह तिकीट हे दैनंदिन वापरात येतात, तर स्मारक तिकीट हे एखादी व्यक्ती, संस्था, घटना, विषय, वनस्पती यांच्या स्मृतीत बनवले जाते. डॉ . महर्षि धोंडो केशव कर्वे, डॉ. विश्‍वेश्‍वरैया, मदर तेरेसा व क्रिकेटर सचिन तेंडूलकर या काही महान व्यक्ती आहेत. ज्यांचे जिवंतपणी फोटो पोस्ट तिकिटावर छापले गेले आहेत.

Web Title: Your selfie now on the ticket to the post

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.