रस्ता दुरुस्तीच्या मागणीसाठी युवकाचे मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 11:48 AM2021-05-10T11:48:21+5:302021-05-10T12:01:18+5:30
Akola News. रस्ता दुरुस्तीच्या मागणीसाठी युवकाचेमोबाईल टॉवरवर चढून आंदोलन केले.
-राहुल सोनोने
वाडेगाव: बाळापूर तालुक्यातील वाडेगाव येथील एका युवकाने अकोला ते वाडेगाव रस्त्याची
दुरुस्ती करण्यात यावी या मागणीसाठी सोमवारी गावातील मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन केले.
मागील दोन ते तीन वर्षांपासू रस्त्याची दुरुस्ती न झाल्याने व संबंधित वर कारवाई न झाल्याने शैलेश मापारी यांनी आत्मदहनाचा इशारा कार्यकारी अभियंता जागतिक बँक प्रकल्प विभाग यांच्याकडे दिलेल्या निवेदनाद्वारे दिला होता.त्यानुसार बेसिक शाळेच्या मोबाईल टॉवर वर १० मे सोमवार रोजी चढून आंदोलनास सुरूवात केली आहे.
अकोला वाडेगाव रस्त्याबाबत २० एप्रिल रोजी रस्त्याच्या दुरावस्थे बाबतीत रस्त्यावर आज रोजी साधी सायकल सुद्धा चालविता येत नसल्याने ग्राम्सथ त्रस्त झाले आहेत.रस्तामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.यावर अनेकांचा अपघात होऊन अपंगत्व आले, तर काहींना जीव गमवावा लागला आहे. यामुळे प्रशासना यंत्रणेवर फोजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा. अन्यथा आत्मदहनाचा इशारा करन्यात येणार असल्याचे सादर करण्यात आलेल्या निवेदनात नमूद आहे .तर या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी परीसरातील नागरीकांनी वेळोवेळी मागणी केली असतानाही रस्त्याच्या दुरुस्तीसाठी काहीच हालचाली होत नसल्याने नागरिकांमध्ये प्रचंड प्रमाणात रोष व्यक्त करण्यात येत आहे. शैलेश मापारी यांनी सोमवारी ६ वाजतापासून आंदोलन सुरु केले.
यावेळी ग्रामस्थांची मोठी गर्दी झाली होती.
माहिती मिळताच बाळापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार दत्तात्रय आव्हाडे व पोलीस प्रशासन पोहचले होते. सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता यांनी गावात येऊन रस्ता दुरुस्तीचे काम लवकरच करण्याचे लेखी आश्वासन दिले. त्यानंतर शैलेश मापारी यांनी आंदोलन मागे घेतले. यावेळी सरपंच मंगेश तायडे, माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ.हिम्मतराव घाटोळ, राजवर्धन डोंगरे, राधेेेश्याम कळसकार, मोहम्मद अफतर,हनिफ भाई, अय्याज साहिल,ऍड सुबोध डोंगरे,अरुण पळसकर, सलीम भाई, सचिन धनोकार,राजू अवचार, अंकुश शहाणे,राजू पळसकर,पठाण सर, मोहनसिग लोध, गणेश मानकर,सागर सरप,सुश्रुत भुस्कुटे, श्रीकांत मसने,नितीन मानकर,किशोर अवचार,गाजनन डोंगरे,सदानंद भुस्कुटे उपस्थित होते.