युवकाची गळफास घेऊन आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2022 05:13 PM2022-02-22T17:13:14+5:302022-02-22T17:13:38+5:30
Youth commits suicide by strangulation : सुरज संजय पंदेकर (२३) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे.
मूर्तिजापूर : येथील गणेश नगर स्थित अन्नपूर्णा देवी मंदिराच्या मागे राहणार्या २३ वर्षीय युवकाने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन जीवनयात्रा संपविल्याची घटना २२ फेब्रुवारी रोजी सकाळी उघडकीस आली. सुरज संजय पंदेकर (२३) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे.
गणेश नगर अन्नपूर्णा देवी मंदिराच्या मागे राहणाऱ्या सुरज संजय पंदेकर या २३ वर्षीय युवकाने आपल्या राहत्या घरात छताच्या कडीला ओढणी बांधून गळफास घेऊन आत्महत्या करून आपली जीवनयात्रा संपविली.
सुरज पंदेकर व त्याचा मोठा भाऊ मनोज यांचे मूर्तिजापूर येथील जुनी वस्ती येथे सलून चे दुकान आहे. सूरज हा आपल्या आजीकडे गणेश नगर, अन्नपूर्णा देवी मंदिर जवळ राहत होता. २२ फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ वाजताच्या सुमारास नाश्ता करण्याकरिता त्याच्या मोठ्या भावाने व आजीने आवाज देऊनही सूरज न आल्याने त्यांनी दरवाजा ठोठावला दरवाजा उघडत नसल्याने खिडकीतून डोकावून पाहिल्यावर त्यांना घराच्या छतास ओढणीने गळफास घेतल्याचे आढळून आले. या प्रकरणी शहर पोलीसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून अधिक तपास शहर पोलीस करीत आहेत.