युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

By सचिन राऊत | Published: July 15, 2023 08:01 PM2023-07-15T20:01:32+5:302023-07-15T20:01:41+5:30

अकोला : खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सिंधी कॅम्प परिसरातील रहिवासी एका ३० वर्षीय युवकाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या ...

Youth committed suicide by hanging | युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

googlenewsNext

अकोला : खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सिंधी कॅम्प परिसरातील रहिवासी एका ३० वर्षीय युवकाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी उशिरा रात्री घडली. या प्रकरणी खदान पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करीत तपास सुरू केला आहे.

 सिंधी कॅम्प परिसरातील रहिवासी शेख जावेद शेख करीम वय ३० वर्ष या युवकाने शुक्रवारी रात्री राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणाची माहिती नातेवाईकांना मिळताच त्यांनी खदान पोलिसांना सांगितले. यावरून खदान पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठून पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठविला. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून प्राथमिक माहितीनुसार आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

Web Title: Youth committed suicide by hanging

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.