रक्तरंजीत धुळवड ; अकोल्यात युवकाची धारदार शस्त्रांनी हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2019 12:52 PM2019-03-22T12:52:30+5:302019-03-22T13:46:04+5:30

अकोला - मोठी उमरी परिसरातील देशी दारुच्या दुकानासमोर लहान उमरीतील रहिवासी हरीश उर्फ गणेश शत्रुघ्न भातुलकर या २३ वर्षीय युवकाची पुर्व वैमनस्यावरुन धारदार शस्त्रांनी हल्ला करून हत्या केल्याची घटना धुळवडीच्या सायंकाळी घडली.

Youth murderd in akola | रक्तरंजीत धुळवड ; अकोल्यात युवकाची धारदार शस्त्रांनी हत्या

रक्तरंजीत धुळवड ; अकोल्यात युवकाची धारदार शस्त्रांनी हत्या

Next

अकोला - मोठी उमरी परिसरातील देशी दारुच्या दुकानासमोर लहान उमरीतील रहिवासी हरीश उर्फ गणेश शत्रुघ्न भातुलकर या २३ वर्षीय युवकाची पुर्व वैमनस्यावरुन धारदार शस्त्रांनी हल्ला करून हत्या केल्याची घटना धुळवडीच्या सायंकाळी घडली. तर हरीषला वाचविण्यासाठी गेलेल्या शुभमवरही या तीन मारेकऱ्यांवर हल्ला चढविल्याने तो गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यासोबतच आकोट फैलमध्ये दोन गटात हाणामारी, बाळापूर रोडवर पुण्यातून अकोल्यात आलेल्या एका युवकावर दोघांनी प्राणघातक हल्ला चढविल्याच्या घटणा घडल्याले जिल्हयात धुळवडीला गालबोट लागले आहे.
मोठी उमरी परिसरातील २३ वर्षीय हरीश शत्रुघ्न भातुलकर हा त्याचा मीत्र शुभम बोरकर याच्यासोबत मोठी उमरीतील देशी दारुच्या दुकानासमोर रंगपंचमी उत्सव साजरा करीत असतांना त्यांच्याच ओळखीतील गणेश निंभोकार, सागर घाटे व श्रीकांत उर्फ बाबू पाटणकर हे तिघे जन तीथे आले आणि पुर्व वैमनस्यावरुन वाद घालत या तिघांनी हरीष भातुलकर याच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला सुरु केला. या तिन मारेकऱ्यांमधील गणेश निंभोकार याने हरिषच्या पाठीवर चाकूने सपासप वार केल्याने हरीष गंभीर जखमी झाला होता. त्यामूळे शुभम बोरकर याने मध्यस्थी करीत हरीषला वाचविण्याचा प्रयत्न केला मात्र या तीन मारेकऱ्यांना शुभमवरही चाकुन हल्ला चढविल्याने तो गंभीर जखमी होउन खाली कोसळला, त्यानंतर या तीनही मारेकºयांनी पुन्हा हरीष भातुलकरवर हल्ला चढवीला, मात्र परिसरातील नागरिकांनी आरडा-ओरड करताच हे मारेकरी घटनास्थळावरुन पळून गेले, त्यानंतर सिव्हील लाईन्स पोलिसांनी घटनास्थळ गाठले, गंभीर जखमी असलेल्या हरीषला नागरिकांच्या साहायाने तातडीने सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले, उपचारादरम्यान सायंकाळी ७ वाजेच्या दरम्यान हरीषचा मृत्यू झाला. तर त्याचा मीत्र शुभमवर उपचार सुरु असून त्याची प्रकृतीही गंभीर असल्याची माहिती वैद्यकीय सुत्रांनी दिली. या प्रकरणी सिव्हील लाईन्स पोलिसांनी गणेश निंभोकार, सागर घाटे व बाबू पाटणकर या तिघांविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३०२, ३०७ नुसार खुन आणि प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या तीनही मारेकºयांचा शोध सुरु केला असून तिघेही फरार झाले आहेत. सिव्हील लाईन्स पोलिसांनी घटनास्थळ पंचनामा तसेच महत्वाचे पुरावे गोळा केले आहेत. घटनास्थळी श्वान पथक व ठसे तज्ज्ञ व फॉरेन्सीक व्हॅनही दाखल झाली होती.

Web Title: Youth murderd in akola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.