भामट्याने सेवानिवृत्त शिक्षकाची दुचाकी पळवीली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2018 01:38 PM2018-03-21T13:38:08+5:302018-03-21T13:38:08+5:30
अकोला - रस्त्याने जाणारा एक जण सेवानिवृत्त नागरिकाच्या दुचाकीसमोर आला. त्याने दुचाकीचा धक्का लागला म्हणून त्याच्या हातातील मोबाइल खाली पाडला. मोबाइल दुरुस्त करून द्या, असे म्हणून तोच दुकानात घेऊन गेला. सेवानिवृत्त नागरिक दुकानदारासोबत मोबाइल दुरुस्तीविषयी बोलत असताना युवक दुचाकी घेऊन पसार झाला.

पातूर तालुक्यातील तांदळी येथील सेवानिवृत्त शिक्षक रामचंद्र कचरू भोरे हे त्यांच्या दुचाकीने कामानिमीत्त अकोला येथे आले होते. सकाळी ११ वाजताच्या दरम्यान जनता भाजी बाजारातून दुचाकीने जात असता समोरून चालत येणाऱ्या इसमाच्या हाताला धक्का लागला व त्याचा मोबाइल खाली पडला. तुमच्यामुळे मोबाइल पडला आता दुरुस्त करून द्या असे तो म्हणाला. माणुसकीच्या नात्याने रामचंद्र भोरे यांनी त्याला दुचाकीवर बसवले व मोबाइल दुरुस्तीच्या दुकानात घेऊन गेले. मात्र दुकानदाराने मोबाइल दुरुस्त होत नाही असे म्हटले. त्यानंतर सोबतच्या इसमाने रामचंद्र भोरे यांना दुचाकीवर मागे बसवले व नवीन बसस्थानकाचे मागील बाजूस असलेल्या श्री मोबाइल रिपेंरिंगच्या दुकानासमोर आणले. रामचंद्र भोरे हे दुचाकीखाली उतरून मोबाइल दुरुस्तीसाठी दुकानात गेले व नादुरूस्त मोबाइल दुकानदाराला दाखविला. मात्र त्यांच्या सोबत असणारा इसम हा दुचाकीवरच बसून होता. मोबाइल बघितल्यावर तो दुरुस्त होत नाही, असे दुकानदाराने म्हटल्यानंतर रामचंद्र भोरे दुकानाच्या बाहेर आले तर त्यांना दुचाकी आणि इसम दिसला नाही. त्यांनी आजुबाजुला शोध घेतल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.