विष प्राशन करून युवकाची आत्महत्या

By admin | Published: February 6, 2017 02:34 AM2017-02-06T02:34:47+5:302017-02-06T02:34:47+5:30

बाळापूरातील घटना.

Youth suicide by poisoning | विष प्राशन करून युवकाची आत्महत्या

विष प्राशन करून युवकाची आत्महत्या

Next

बाळापूर (अकोला), दि. ५- तालुक्यातील निंबी मालोकार येथील ३0 वर्षीय युवकाने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना ४ फेब्रुवारीच्या रात्री घडली. या प्रकरणी बाळापूर पोलिसांनी आक स्मिक मृत्यूंची नोंद केली आहे. बाळापूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणार्‍या निबी मालोकार येथील नितीन प्रकाश इंगळे या युवकाने ४ फेब्रुवारीच्या रात्री गुरांच्या गोठय़ात विष प्राशन करून आत्महत्या केली. या प्रकरणी सुरेंद्र गुळदे यांच्या फिर्यादीवरून बाळापूर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.

Web Title: Youth suicide by poisoning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.