गणेश विसर्जनाकरिता गेलेला युवक धरणात बुडाला
By admin | Published: September 28, 2015 02:25 AM2015-09-28T02:25:02+5:302015-09-28T02:25:02+5:30
पोपटखेड प्रकल्पावरील घटना.
आकोट (जि. अकोला): गणेश विसर्जनाकरिता गेलेला युवक पोपटखेड धरणात बुडाल्याची दुर्दैवी घटना रविवारी घडली. या घटनेने जिल्ह्यात विसर्जनाला गालबोट लागले. लोहारी मार्गावरील अहल्याबाई होळकर नगरातील गणेश मंडळाच्या गपणती मूर्तीचे विसर्जन करण्याकरिता २७ सप्टेंबर रोजी भाविक पोपटखेड धरणावर गेले होते. गणेश मंडळातील सदस्यांसोबत सिद्धेश्वर मोहन इंगळे (२३) (रा.माटरगाव, जि. बुलडाणा) हा सुद्धा गेला होता. गणेश विसर्जनानंतर परत येताना सिद्धेश्वर इंगळे आढळून आला नाही. त्यामुळे तो धरणात बुडाला असावा, असा अंदाज व्यक्त केल्या जात आहे. घटनेची माहिती मिळताच तहसीलदार प्रदीप पाटील यांच्यासह ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार किशोर शेळके व पथक घटनास्थळावर दाखल झाले होते. सायंकाळपर्यंत सिद्धेश्वरला शोधण्यात यश आले नव्हते. बुलडाणा जिल्ह्यातील माटरगाव येथील मूळचा रहिवासी असलेला सिद्धेश्वर इंगळे हा आकोट येथील एका खासगी फायनान्स कंपनीत आहे.