पातूर-बाळापूर मार्गावर ‘मॉर्निंग वॉक’ला गेलेल्या युवकास अज्ञात वाहनाने चिरडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2019 03:08 PM2019-01-14T15:08:03+5:302019-01-14T15:08:23+5:30
पातूर : पहाटे फिरावयास गेलेल्या येथील युवकास पातूर-बाळापूर मार्गावरील वैद्यकीय महाविद्यालयाजवळ अज्ञात वाहनाने चिरडल्याची घटना सोमवारी घडली. जितेंद्र घुले (३०)असे युवकाचे नाव असून, अपघातात डोक्याचा चेंदामेंदा झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

पातूर येथील महोली नगर भागात राहणारा जितेंद्र घुले हा सोमवारी पहाटे नित्यनियमाप्रमाणे ‘मॉर्निंग वॉक’साठी बाळापूर मार्गावर गेला होता. पहाटे पाच वाजताचे सुमारास वैद्यकीय महाविद्यालयासमोर एका भरधाव वाहनाने त्याला जोरदार धडक दिली. वाहन अंगावरून गेल्याने त्याच्या डोक्याचा पार चेंदामेंदा झाला. या घटनेत त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पातूर पोलिसांनी घटनास्थळाव धाव घेतली. पंचनामा केल्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात ंपाठविण्यात आला. जितेंद्र घुले याचे बाळापूर मार्गावर केश कर्तनालयाचे दुकान असून, तो परिसरात मनमिळावू युवक म्हणून ओळखल्या जात होता.