अकोलानजीकच्या अपघातात यवतमाळचा दुचाकीस्वार युवक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2020 18:05 IST2020-11-04T17:49:29+5:302020-11-04T18:05:30+5:30
या अपघातात सचिन मेश्राम गंभीर जखमी होऊन घटना स्थळावरच त्यांचा दृर्दैवी मृत्यू झाला.

अकोलानजीकच्या अपघातात यवतमाळचा दुचाकीस्वार युवक ठार
बोरगाव मंजू: राष्ट्रीय महामार्गावर बोरगाव मंजू पोलिस ठाण्याच्या हद्दीतील वणीरंभापुर नजीक भरधाव ट्रकने दुचाकीस्वाराला धडक दिली. या अपघातात एक दुचाकीस्वार ठार झाला. ही घटना बुधवारी ४ नोव्हेंबर रोजी दुपारी घडली. सचिन मेश्राम वय ३८ असे मृतकाचे नाव आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सचिन राजु मेश्राम वय ३८ रा.आदर्श नगर यवतमाळ हे आपल्या दुचाकी क्रंमाक एम.एच.२८ बी .सी.७४०३ जात होते. दरम्यान नागपूर कडे जाणारा मालवाहू ट्रक क्रमांक एम.एच.४० एके.९७६५ या ट्रक ने दुचाकीवरून जाणार्या सचिन मेश्राम यांना चिरडले. या अपघातात सचिन मेश्राम गंभीर जखमी होऊन घटना स्थळावरच त्यांचा दृर्दैवी मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिस कर्मचारी योगेश काटकर, संजय इंगळे यांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनास्थळाचा व मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला. वृत्त लिहीस्तोर पोलीस दफ्तरी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. पुढील तपास ठाणेदार सुनील सोळंके सह पोलीस करत आहेत.