सावरखेडजवळील शेतात युवकाचा खून

By admin | Published: March 5, 2017 01:52 AM2017-03-05T01:52:16+5:302017-03-05T01:52:16+5:30

चार संशयित ताब्यात; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल.

Youth's blood in the fields near Savarkade | सावरखेडजवळील शेतात युवकाचा खून

सावरखेडजवळील शेतात युवकाचा खून

Next

पातूर, दि. ४- नजीकच्या सावरखेड शेतशिवारातील मोहनलाल यादव (परदेशी) यांच्या शेतात मेडशी येथील युवक नितीन रुस्तम कांबळे (३0) याचा धारदार शस्त्राने डोक्यावर घाव घालून खून करण्यात आला. सदर घटना ३ मार्चच्या रात्री उघडकीस आली.
नितीन रुस्तम कांबळे हा मेडशी येथे राहत असून, तो २ मार्चच्या रात्री घरातून गायब होता. दुसर्‍या दिवशीसुद्धा तो घरी परत न आल्याने त्याचे आईने सर्वत्र शोध घेतला. याबाबत मालेगाव पोलीस ठाण्यात त्यांनी हरवल्याबाबत तक्रारसुद्धा देण्यात आली. मात्र, ३ मार्चच्या सायंकाळी नागरिकांच्या चर्चेतून त्यांचा मुलगा नितीन हा सावरखेड येथे मरण पावला असल्याचे त्यांना समजले. यामुळे मृतकाच्या आईने घटनास्थळी जाऊन मृतदेह पाहिला असता तो नितीनच असल्याची खात्री झाली. त्यामुळे त्यांनी पातूर पोलीस स्टेशनमध्ये धाव घेऊन नितीनचा खून झाल्याची तक्रार दिली. सदर माहिती प्राप्त झाल्यानंतर घटनास्थळावर अँडीशनल एसपी विजयकांत सागर, एसडीपीओ भराडे, ठाणेदार अनिरुद्ध अढाव, उपनिरीक्षक विजय महाले, उपनिरीक्षक मनोज वासाडे, उपनिरीक्षक आनंद कांबळे यांनी धाव घेऊन घटनास्थळ गाठून मृतकास अकोला येथे रवाना करण्यात आले आहे.
मृतकाच्या आईचे तक्रारीवरून बुरहान युनूस पठाण, अकबर युनूस पठाण, निजाम छोटू खाँ पठाण, राजू विष्णू साठे सर्व रा. मेडशी या चौघांना संशयित म्हणून ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी आरोपीविरुद्ध ३0२, ३४ भादंवि गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळावरून मृतकाची एमएच ३७-५७९४ क्रमांकाची मोटारसायकल व मोबाइल घटनास्थळावरून गायब आहे.
सदर घटनास्थळावर मृतकास पूर्वीच दारू पाजून या ठिकाणी आणून येथेसुद्धा दारू पाजली. काही कारणावरून वाद होऊन मृतक नितीन कांबळे याचे डोक्यावर धारदार शस्त्राने वार करून त्याची हत्या करण्यात आली, असे प्रथमदर्शनी दिसून येत आहे.

Web Title: Youth's blood in the fields near Savarkade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.