युवकांच्या आत्महत्या चिंताजनक

By Admin | Published: August 10, 2014 12:20 AM2014-08-10T00:20:46+5:302014-08-10T00:20:46+5:30

चिंतनाची गरज : जास्त प्रमाण १८ ते ३५ वयोगटातील

Youths' suicide is worrying | युवकांच्या आत्महत्या चिंताजनक

युवकांच्या आत्महत्या चिंताजनक

googlenewsNext

खामगाव : जीवनामध्ये आलेली निराशा, वैफल्यग्रस्त जीवन, तसेच घरातील छोटे मोठे वाद, मित्रांशी भांडणे, परिक्षेत अपयश अशा विविध कारणावरुन समाजात आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढत आहे. गेल्या वर्षभरात खामगाव येथील सामान्य रुग्णालयात अशा आत्महत्येचा प्रयत्न करणार्‍या ४३0 जणांवर उपचार करण्यात आले. यामध्ये ७0 टक्के प्रमाण हे १८ ते ३५ वयोगटातील असल्याचे दिसून आले आहे.
समाजामध्ये जीवन जगत असताना प्रत्येक माणसाला कुटूंबासोबतच बाहेरही सर्वांसोबत संबंध प्रस्थापित करावे लागतात. तसेच आयुष्याच्या अखेरचे दिवस सुखात जाण्यासाठी माणूस प्रयत्नरत असतो. सध्याच्या संगणकाच्या युगात तर प्रत्येकजण आधुनीक तंत्रज्ञानाशी जुळला आहे. जीवनाच्या या वाटेवर मात्र प्रगतीकडे असताना अपयश, छोट्या मोठय़ा कारणावरुन कुटूंबातील सदस्यांशी वाद, प्रेयसी वा प्रियकराकडून झालेल्या प्रेमभंग, शैक्षणिक घसरण यामुळे जीवनात निराशा प्राप्त होते. माणसातील समजुतदारपणा कमी झाल्यामुळे तो आयुष्याला कंटाळून या अख्या जगाचा निरोप घ्यायचा म्हणून आत्महत्येचा मार्ग पत्करतो. जीवनात यापुढे अंधकारमय वातावरण असल्याचा त्याला भास होवून स्वत:चे आयुष्य संपविण्याचे प्रयत्न होतात.
खामगाव येथील सामान्य रुग्णालयात मार्च २0१३ ते जुलै २0१४ या कालावधीत तब्बल ४३0 जणांनी विषप्राशन तसेच अन्य मार्गाने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. यामध्ये १३२ महिला तर २९८ पुरुषांचा समावेश आहे. विशेष म्हणजे आत्महत्येचा प्रयत्न केलेला ४३0 जणांपैकी ७0 टक्के प्रमाण हे १९ ते ३५ वयोगटातील असल्याचे दिसून आले आहे. युवकांचा आत्महत्येकडे वाढलेला कल ही आज धक्कादायक बाब असून याला प्रतिबंध घालण्यासाठी समाजातील विविध संघटनांनी पुढे येवून चिंतनाची गरज आहे.

Web Title: Youths' suicide is worrying

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.