'स्टुडंट समरी' देणार विद्यार्थ्यांची 'ए टू झेड' माहिती
By admin | Published: November 28, 2015 02:21 AM2015-11-28T02:21:26+5:302015-11-28T02:21:26+5:30
माहिती समाविष्ट करण्यासाठी ३0 नोव्हेंबरपर्यंतची मुदत.
प्रवीण खेते/अकोला : सरल प्रणाली अंतर्गत शाळा, शिक्षक व विद्यार्थ्यांची माहिती सादर केल्यानंतर आता स्कूल डेटाबेसमध्ये ह्यस्टुडंट समरीह्ण समाविष्ट करण्याची प्रक्रिया सुरू आहे. स्टुडंट समरीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची ह्यए टू झेडह्ण माहिती मिळणार असल्याने सरल प्रणाली परिपूर्ण झाली आहे. आगामी काळात शासकीय योजना आखताना ही माहिती फायदेशीर ठरणार असून, माहिती समाविष्ट करण्यासाठी शाळांना ३0 नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. शिक्षण विभागाचे कामकाज ऑनलाइन पद्धतीने आणि जलद व्हावे, यासाठी नवीन शैक्षणिक सत्रापासून राज्यभरात सरल प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. या प्रणाली अंतर्गत स्कूल डेटाबेस, टीचर डेटाबेस आणि स्टुडंट डेटाबेस यामध्ये शाळा, शिक्षक आणि विद्यार्थ्यांची माहिती ऑनलाइन पद्धतीने संकलित करण्यात आली आहे. वर्षभर सुरू असलेल्या या प्रक्रियेनंतर विद्यार्थ्यांची संपूर्ण माहिती ह्यस्टुडंट समरीह्णच्या स्वरूपात स्कूल डेटाबेसमध्ये संकलित करण्यात येत आहे. स्टुडंट समरीमध्ये विद्यार्थ्यांची ह्यए टू झेडह्ण माहिती मिळणार असल्याने विद्यार्थ्यांंसाठी योजना आखताना फायदेशीर ठरणार आहे, तसेच या माहितीमुळे शालेय योजनांमध्ये होणार्या घोटाळ्य़ांना आळा घालण्यास मदत मिळणार आहे; तथापि अद्यापही अनेक शाळांनी स्कूल डेटाबेसमध्ये स्टुडंट समरी समाविष्ट केली नसल्याने ३0 नोव्हेंबरपर्यंत शाळांना अंतिम संधी देण्यात आली आहे. अशी आहे ह्यस्टुडंट समरीह्ण विद्यार्थ्यांंचा जन्मदिवस, धर्म, जात, प्रवर्ग, परीक्षांमध्ये मिळालेले गुण (रिपोर्ट कार्ड), विद्यार्थी दाखल-खारीज क्रमांक, शाळेतील दाखल दिवस, विद्यार्थ्याला मिळालेल्या विविध शासकीय योजनांचा लाभ, प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत घेण्यात येणार्या प्रत्येक चाचणीची माहिती तसेच विद्यार्थ्यांंशी संबंधित प्रत्येक माहितीचा लेखाजोखा यामध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. शिक्षकांची डोकेदुखी संपणार शिक्षकांना दरवर्षी संचमान्यता, यूडाइज यासाठी विद्यार्थी संख्या मोजावी लागत होती, तसेच विविध योजनांसाठी प्रवर्गनिहाय विद्यार्थ्यांंची माहिती गोळा करावी लागत होती. आता स्टुडंट समरीमुळे विद्यार्थ्यांंची माहिती एका क्लिकवर मिळणार असल्याने शिक्षकांची डोकेदुखी कायमची संपणार आहे.