जिल्हा परिषद ‘सीईओ’ आज घेणार बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:27 AM2021-02-23T04:27:41+5:302021-02-23T04:27:41+5:30
..................................... वाळूची अवैध वाहतूक सुरूच! अकोला : जिल्ह्यात वाळूचे अवैध उत्खनन आणि वाहतूक रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय ...
.....................................
वाळूची अवैध वाहतूक सुरूच!
अकोला : जिल्ह्यात वाळूचे अवैध उत्खनन आणि वाहतूक रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय पथके आठ दिवसांपूर्वी गठीत करण्यात आली. मात्र, पथकांकडून अद्याप कारवाई सुरू करण्यात आली नसल्याने, जिल्ह्यात वाळूची अवैध वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरूच असल्याचे चित्र आहे.
...............................................
स्वॅब नमुने घेण्यासाठी आजपासून शिबिरे!
अकोला : कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग नियंत्रित करण्यासाठी अकोला तालुक्यातील ग्रामीण भागात सोमवारपासून गावनिहाय विशेष शिबिरे घेण्यात येणार आहेत. या शिबिरांमध्ये आरोग्य तपासणीसह स्वॅब घेण्यात येणार आहेत. असे अकोल्याचे उपविभागीय अधिकारी डाॅ.नीलेश अपार यांनी सांगितले.
....................................................
शिक्षकांना केव्हा मिळणार पदोन्नती?
अकोला : जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागांतर्गत शिक्षकांची बिंदुनामावली अद्ययावत करण्याचे काम अद्यापही पूर्ण करण्यात आले नसल्याने, जिल्ह्यातील पात्र शिक्षकांना पदोन्नती देण्याची प्रक्रिया रखडली आहे. त्यामुळे पात्र शिक्षकांना पदोन्नती मिळणार तरी केव्हा, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.