जिल्हा परिषद 'साईओ'नी घेतली बांधकाम, अर्थ विभागाची झाडाझाडती! कामकाजाची केली पाहणी
By संतोष येलकर | Updated: May 15, 2024 14:44 IST2024-05-15T14:44:18+5:302024-05-15T14:44:33+5:30
बांधकाम व अर्थ विभागातील कामकाजाची पडताळणी त्यांनी यावेळी केली. जिल्हा परिषदेच्या सर्व विभागांचे कार्यालयीन कामकाज आता ई ऑफीस या संगणकीय प्रणालीद्वारे होणार असून, याबाबत कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे.

जिल्हा परिषद 'साईओ'नी घेतली बांधकाम, अर्थ विभागाची झाडाझाडती! कामकाजाची केली पाहणी
अकोला : जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी (साईओ ) बी. वैष्णवी यांनी बुधवारी सकाळी जिल्हा परिषदेच्या बांधकाम आणि अर्थ विभागाला आकस्मिक भेट दिली. कामकाजची पाहणी करीत झाडाझाडती घेतली. यावेळी त्यांच्या समवेत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विनय ठमके होते.
बांधकाम व अर्थ विभागातील कामकाजाची पडताळणी त्यांनी यावेळी केली. जिल्हा परिषदेच्या सर्व विभागांचे कार्यालयीन कामकाज आता ई ऑफीस या संगणकीय प्रणालीद्वारे होणार असून, याबाबत कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे. या प्रणालीद्वारे सर्वप्रथम बांधकाम विभागाचे कामकाज याच आठवड्यात सुरू करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी बी. वैष्णवी यांनी यावेळी दिले. आता बांधकाम विभागातील सर्व कामकाज ऑनलाईन संगणकीय प्रणालीद्वारेच करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. यावेळी कार्यकारी अभियंता (बांधकाम) व बांधकाम विभागाचे संबंधित अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
कामे वेळेत पूर्ण करा, रंगाई होता कामा नये!
विविध प्रकारची बांधकामे ही नियोजित वेळेत पूर्ण करून, कामात दिरंगाई होणार नाही,याबाबत दक्षता घेण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी संबंधीत अधिकारी व कर्मचाऱ्यांना यावेळी दिले.