जिल्हा परिषद निवडणूक : निवडणूक खर्च भागविण्यासाठी हवे ५ कोटी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2019 10:40 AM2019-12-28T10:40:55+5:302019-12-28T10:41:06+5:30

निवडणूक खर्च भागविण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत २३ डिसेंबर रोजी राज्य निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे.

Zilla Parishad Election: Need to 5 crore to cover election expenses! | जिल्हा परिषद निवडणूक : निवडणूक खर्च भागविण्यासाठी हवे ५ कोटी!

जिल्हा परिषद निवडणूक : निवडणूक खर्च भागविण्यासाठी हवे ५ कोटी!

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : जिल्हा परिषद व जिल्ह्यातील सातही पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा खर्च भागविण्यासाठी ५ कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे. त्यानुषंगाने निवडणूक खर्च भागविण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत २३ डिसेंबर रोजी राज्य निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे.
जिल्हा परिषदेचे ५३ गट आणि जिल्ह्यातील सातही पंचायत समित्यांच्या १०६ गणांसाठी निवडणूक घेण्यात येत आहे. या निवडणुकीसाठी मतदार याद्यांची छपाई, मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मानधन, मतदान पथकांसाठी बस व्यवस्था, वाहनांचा इंधन खर्च, शामियाना, स्टेशनरी यासह निवडणूकविषयक इतर खर्च भागविण्यासाठी ५ कोटी रुपयांचा निधी लागणार आहे. त्यानुषंगाने जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा खर्च भागविण्यासाठी आवश्यक असलेला निधी उपलब्ध करून देण्याची मागणी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत राज्य निवडणूक आयोगाकडे २३ डिसेंबर रोजी पत्राद्वारे करण्यात आली आहे.

निधीअभावी खर्च उधारीवर सुरू!
जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा खर्च भागविण्यासाठी निधीची मागणी राज्य निवडणूक आयोगाकडे पाच दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आली आहे; परंतु अद्याप निधी उपलब्ध झाला नाही. त्यामुळे निधीअभावी जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा खर्च सध्या जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत उधारीवर सुरू आहे.

जिल्हा परिषद व जिल्ह्यातील सातही पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा खर्च भागविण्यासाठी ५ कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे. त्यानुषंगाने निधी उपलब्ध करून देण्याची मागणी राज्य निवडणूक आयोगाकडे पत्राद्वारे करण्यात आली आहे. लवकरच निधी उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे.
- संजय खडसे, उपजिल्हाधिकारी तथा नोडल अधिकारी,
जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक.

Web Title: Zilla Parishad Election: Need to 5 crore to cover election expenses!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.