पाणीटंचाईचा खर्च भागविण्यासाठी जिल्हा परिषदेला ३.५० कोटी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2019 01:49 PM2019-01-23T13:49:21+5:302019-01-23T13:49:34+5:30
अकोला: जिल्ह्यात पाणीटंचाई निवारणासाठी गतवर्षी करण्यात आलेल्या उपाययोजनांच्या कामांचा खर्च भागविण्यासाठी शासनामार्फत उपलब्ध ३ कोटी ५० लाख रुपयांचा निधी जिल्हा परिषदेला वितरित करण्यात येत असल्याचा आदेश प्रभारी जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर यांनी २१ जानेवारी रोजी दिला.
अकोला: जिल्ह्यात पाणीटंचाई निवारणासाठी गतवर्षी करण्यात आलेल्या उपाययोजनांच्या कामांचा खर्च भागविण्यासाठी शासनामार्फत उपलब्ध ३ कोटी ५० लाख रुपयांचा निधी जिल्हा परिषदेला वितरित करण्यात येत असल्याचा आदेश प्रभारी जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर यांनी २१ जानेवारी रोजी दिला. उपलब्ध निधीतून पाणीटंचाई निवारणाच्या कामांची थकीत देयके अदा करण्यात येणार आहेत.
जिल्ह्यातील ग्रामीण भागात सन २०१७-१८ या वर्षात पाणीटंचाई निवारणासाठी जिल्हा परिषदमार्फत करण्यात आलेल्या विविध उपाययोजनांच्या कामांचा खर्च भागविण्यासाठी शासनामार्फत प्राप्त निधीतून यापूर्वी जिल्हा परिषदेला ५ कोटी ४४ लाख ९७ हजार रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे. पाणीटंचाई निवारणाच्या उपाययोजनांच्या कामांचा उर्वरित खर्च भागविण्यासाठी आणि पाणीटंचाई निवारणाच्या कामांची थकीत देयके अदा करण्यासाठी आणखी ३ कोटी ५० लाख रुपयांचा निधी शासनामार्फत जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाला आहे. उपलब्ध ३ कोटी ५० लाख रुपयांचा निधी जिल्हा परिषदेला वितरित करण्यात येत असल्याचा आदेश प्रभारी जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर यांनी २१ जानेवारी रोजी दिला आहे. जिल्हा परिषदेला वितरित करण्यात आलेल्या निधीतून गतवर्षी जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत करण्यात आलेल्या पाणीटंचाई निवारणाच्या कामांची थकीत देयके अदा करण्यात येणार आहेत.
निधी खर्चाचे विनियोग प्रमाणपत्र सादर करण्याचे निर्देश!
वितरित करण्यात आलेल्या निधी खर्चाचे विनियोग प्रमाणपत्र जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावे, असे निर्देशही जिल्हाधिकाºयांच्या निधी वितरण आदेशात देण्यात आले आहेत.