जिल्हा परिषदेत स्वयंसहायता समूहाद्वारे निर्मित वस्तूंचे विक्री केंद्र सुरू!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:32 AM2021-02-06T04:32:55+5:302021-02-06T04:32:55+5:30
अकोला : जिल्ह्यातील ग्रामीण भागातील गरीब कुटुंबातील महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी ग्रामीण भागातील स्वयंसहायता समूहाद्वारे निर्मित वस्तूंचे ...
अकोला : जिल्ह्यातील ग्रामीण भागातील गरीब कुटुंबातील महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी ग्रामीण भागातील स्वयंसहायता समूहाद्वारे निर्मित वस्तूंचे विक्री केंद्र जिल्हा परिषद परिसरात शुक्रवारी सुरू करण्यात आले.
जिल्ह्यातील ग्रामीण भागातील गरीब कुटुंबातील महिलांना रोजगार उपलब्ध करुन त्यांची उपजिवीका निर्माण करणे तसेच उत्पादकता ते ग्राहक या संकल्पनेतून गुणवत्तापूर्ण उत्पादने ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियान (उमेद), ग्रामविकास विभाग, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा व जिल्हा परिषदमार्फत हा उपक्रम सुरू करण्यात आला. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील स्वयंसहायता समूहाद्वारे निर्मित वस्तू व कला एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी वस्तूंचे विक्री केंद्र जिल्हा परिषद परिसरात सुरू करण्यात आले आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष प्रतीभा भोजने यांच्या हस्ते फीत कापून वस्तू विक्री केंद्र उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक सूरज गोहाड, उमेद अभियान जिल्हा समन्वयक प्रतीभा अवचार, जिल्हा अभियान व्यवस्थापक गजानन महल्ले, जिल्हा व्यवस्थापक (उपजीविका) पवन आडे यांच्यासह उमेद अभियानांतर्गत जिल्ह्यातील स्वयंसहायता समूहाच्या प्रतिनिधी उपस्थित होत्या.
...............................फोटो...........................