जिल्हा परिषद सदस्यांची परतीसाठी लागणार कसोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:33 AM2021-03-13T04:33:01+5:302021-03-13T04:33:01+5:30

राजेश शेगाेकार लोकमत न्यूज नेटवर्क अकाेला : निवडणूक आयोगाने रद्द झालेल्या जागेवर पुन्हा निवडणुका घेण्यात येईल, असे स्पष्ट ...

Zilla Parishad members will be tested for return | जिल्हा परिषद सदस्यांची परतीसाठी लागणार कसोटी

जिल्हा परिषद सदस्यांची परतीसाठी लागणार कसोटी

Next

राजेश शेगाेकार

लोकमत न्यूज नेटवर्क

अकाेला : निवडणूक आयोगाने रद्द झालेल्या जागेवर पुन्हा निवडणुका घेण्यात येईल, असे स्पष्ट केले आहे. निवडणुका जर लागल्या तर सदस्यत्व रद्द झालेल्यांपैकी काहींना पुन्हा जिल्हा परिषदेत परतणे अवघड ठरण्याची चिन्हे आहेत. २०२० मध्ये झालेल्या निवडणुकीत काही सदस्य अतिशय अटीतटीच्या फरकाने निवडून आले आहे. सदस्यत्व रद्द झालेल्या १४ सदस्यांनी २०२० मध्ये मिळविलेल्या मतांचा आढावा घेतला असता, सहा सदस्य अवघ्या ५०० मतांच्या फरकानेही निवडून आले आहे. त्यामुळे आता पुन्हा निवडणुका लागल्यास या सदस्यांना परतीसाठी जाेरकस प्रयत्न करावे लागतील, अशी स्थिती आहे

वंचित बहुजन आघाडीला फटका

जिल्हा परिषदेतील ५३ जागांपैकी २२ जागा जिंकून वंचित बहुजन आघाडीने सत्ता स्थापन केली हाेती. आता ‘ओबीसी’ प्रवर्गातील जिल्हा परिषदेचे १४ सदस्य व सहा पंचायत समित्यांच्या २४ सदस्यांचे सदस्यत्व रद्द झाले आहे. त्यामध्ये जिल्हा परिषदेचे शिक्षण व बांधकाम सभापती चंद्रशेखर पांडे गुरुजी, महिला व बालकल्याण सभापती मनीषा बोर्डे यांचा समावेश असून, ‘वंचित’चे सर्वाधिक ८ सदस्य आहेत; त्यामुळे पुन्हा सत्तेचा साेपान चढायचा असेल तर वंचितला या आठ जागा कायम ठेवून आणखी जागा जिंकणे आवश्यक आहे जिल्हा परिषदेत नियुक्त केलेल्या पदाधिकाऱ्यांनी गेल्या वर्षभरात जाे कारभार केला आहे, या कारभाराचेही मूल्यमापन या निमित्ताने हाेणार आहे. मिळालेल्या पदांचा फायदा ग्रामीण जनतेला कितपत मिळाला, याचा हिशेब या निमित्ताने जनताच देणार असल्याने आगामी पाेट निवडणूक ‘वंचित’साठी प्रतिष्ठेचीच ठरणार आहे

पदाधिकाऱ्यांच्या मतदारसंघावर सर्वाधिक लक्ष

जिल्हा परिषदेचे शिक्षण व बांधकाम सभापती चंद्रशेखर पांडे गुरुजी यांच्या कानशिवणी महिला व बालकल्याण सभापती मनीषा बोर्डे यांच्या कुरणखेड या सर्कलवर सर्वाधिक लक्ष राहणार असून, इतर पक्षांकडून या दाेन्ही सदस्यांना लक्ष्य करण्यात येणार आहे. पांडे गुरुजी यांना गेल्या निवडणुकीत काॅंग्रेसचे शिवा माेहड यांनी चांगलीच टक्कर दिली हाेती; त्यामुळे अवघ्या ५५२ मतांनी गुरुजींना मताधिक्य घेता आले तर बाेर्डे यांनी तब्बल २०४९ मतांचे मताधिक्य घेत भाजपच्या पूजा उमाळे यांना पराभूत केले हाेते; त्यामुळे या दाेन्ही पदाधिकाऱ्यांचा कारभार त्या सर्कलमधील मतदारांना कितपत भावला व मतदारांवरील त्यांचा प्रभाव कायम राहिला का याचीही परीक्षा या निवडणुकीत हाेणार आहे.

महाविकास आघाडी झाल्यास तिरंगी लढत

राज्यात शिवसेनेच्या नेतृत्वात काॅंंग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार स्थापन झालेले आहे; त्यामुळे जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा प्रयाेग झाल्यास वंचित भाजप व महाविकास आघाडी अशी तिरंगी लढत हाेण्याची शक्यता आहे.

पक्ष सदस्य सदस्यत्व रद्द

भारिप बहुजन महासंघ : २२ ०८

शिवसेना : १२ ०१

भाजप : ०७ ०३

राष्ट्रवादी : ०३ ०१

काँग्रेस : ०५ ०१

अपक्ष : ०४ ००

जिल्हा परिषद गटनिहाय विजयी ‘ओबीसी’ सदस्यांना मिळालेले मताधिक्य कानशिवणी - चंद्रशेखर पांडे गुरुजी ५५२

अंदुरा - संजय बावणे १२९४

देगांव - राम गव्हाणकर ६४२

शिर्ला - सुनील फाटकर १५०३

कुरणखेड - मनीषा बोर्डे २०४९

अडगाव - प्रमोदिनी कोल्हे ११०४

तळेगाव - संगीता अढाऊ ६८३

दानापूर - दीपमाला दामधर ३१८

दगडपारवा - सुमन गावंडे ३७६

अकोलखेड - गजानन डाफे २१८

बपोरी - माया कावरे ११०३

लाखपुरी - अप्पू तिडके ११२१

कुटासा - कोमल पेठे ४७०

घुसर - पवन बुटे २३

Web Title: Zilla Parishad members will be tested for return

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.