जिल्हा परिषद नर्सेस संघटनेची जिल्हा कार्यकारिणी जाहीर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:14 AM2021-07-19T04:14:03+5:302021-07-19T04:14:03+5:30

अकोला : महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद नर्सेस संघटनेची जिल्हा कार्यकारिणी रविवारी जाहीर करण्यात आली असून, त्यामध्ये संघटनेच्या ...

Zilla Parishad Nurses Association District Executive announced! | जिल्हा परिषद नर्सेस संघटनेची जिल्हा कार्यकारिणी जाहीर !

जिल्हा परिषद नर्सेस संघटनेची जिल्हा कार्यकारिणी जाहीर !

Next

अकोला : महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद नर्सेस संघटनेची जिल्हा कार्यकारिणी रविवारी जाहीर करण्यात आली असून, त्यामध्ये संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी संगीता जाधव व सचिवपदी ज्योती रोठे यांची निवड करण्यात आली.

महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद नर्सेस संघटनेची जिल्हा बैठक घेण्यात आली. संघटनेच्या राज्य सरचिटणीस लता पाटील, राज्य कोषाध्यक्ष वैशाली दुर्गाडे, विभागीय संघटक उर्मिला कांगटे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत संघटनेची अकोला जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. त्यामध्ये जिल्हाध्यक्षपदी संगीता जाधव, सचिवपदी ज्योती रोठे तर कार्याध्यक्षपदी सविता केदार, कोषाध्यक्ष कामिनी खडके, उपाध्यक्षपदी जया काळे, जयश्री बोळे, संगीता पोहरे, नीलिमा बोंद्रे, ज्योती नागे, सहसचिवपदी नीता जाधव, सुचित्रा भांबळ, वर्षा वानखडे, मंगला तितूर, रुपाली राणे आणि जिल्हा संघटक म्हणून सुनीता मुळे, रुपाली तुपोने, नभू मानकर, शुभांगी फुसे, सुनीता धनभर व सल्लागार म्हणून कांता सोळंके, वृंदा विजयकर, शमा बायस्कर, कीर्ती तिवारी यांची निवड करण्यात आली. बैठकीचे संचालन जया काळे, विभा पागेकर यांनी तर आभारप्रदर्शन जयश्री बोळे यांनी केले. या बैठकीला जिल्ह्यातील आरोग्य सेविका व आरोग्य पर्यवेक्षिका उपस्थित होत्या.

.......................फोटो.................................

Web Title: Zilla Parishad Nurses Association District Executive announced!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.