फसवणूक प्रकरणात जिल्हा परिषदेतील अधिकारी सहभागी

By admin | Published: August 15, 2015 01:28 AM2015-08-15T01:28:10+5:302015-08-15T01:28:10+5:30

शिक्षणसेवकपदी नियुक्तीचे बनावट आदेशपत्र देऊन बेरोजगार युवकाची सुमारे सात लाख रुपयांनी फसवणूक.

Zilla Parishad officials participate in cheating case | फसवणूक प्रकरणात जिल्हा परिषदेतील अधिकारी सहभागी

फसवणूक प्रकरणात जिल्हा परिषदेतील अधिकारी सहभागी

Next

अकोला: जिल्हा परिषदेमध्ये शिक्षणसेवकपदी नियुक्तीचे बनावट आदेशपत्र देऊन बेरोजगार युवकाची सुमारे सात लाख रुपयांनी फसवणूक करण्यात आली असून, या प्रकरणात जिल्हा परिषदेतील वर्ग-१ दर्जाचा अधिकारी सहभागी असल्याची माहिती समोर आली आहे. या सात लाख रुपयांची देवाण-घेवाण या अधिकार्‍याच्या निवासस्थानी झाली असल्याची माहिती एका आरोपीस अटक केल्यानंतर समोर आली आहे. अनिकट येथील रहिवासी सुरज राजेंद्र लोणारे (२५) या बेरोजगार युवकास पातूर येथील रहिवासी मोहम्मद इलियास खान मोहम्मद इक्बाल याने जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात शिक्षणसेवकांच्या रिक्त जागांची भरती प्रक्रिया सुरू झाली असून, यामध्ये नोकरी लावून देण्याचे आमिष दाखविले. केवळ सात लाख रुपयांचा ह्यरेटह्ण सुरू असल्याचे सांगून लोणारे याच्याकडून सात लाख रुपयांची रक्कम उकळण्यासाठी एका अधिकार्‍याची भेटही घालून दिली. सदर युवकाला अधिकारी भेटल्यानंतर त्याला या नोकरीसंदर्भात विश्‍वास पटला. त्यानंतर अधिकारी व दलालाच्या आमिषाला बळी पडत लोणारे याने मित्र मंडळी व नातेवाईकांकडून उधार घेऊन सात लाख रुपये गोळा केले व मोहम्मद इलियास खान मोहम्मद इक्बाल याच्यामार्फत अधिकार्‍याच्या निवासस्थानावरच त्यांना दिले. या आरोपीने लोणारे याला जिल्हा परिषद शिक्षण विभागातील अधिकारी यांच्या स्वाक्षरी व शिक्क्यांसह असलेले नियुक्ती आदेशपत्र दिले. नियुक्ती आदेशपत्र मिळाल्यानंतर या युवकाने जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात चौकशी केली असता शिक्षण विभागाद्वारे सदर आदेशपत्र बनावट असल्याचे त्याला सांगण्यात आले. त्यामुळे या प्रकरणी सुरज लोणारे याने सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी मोहम्मद इलियास खान मोहम्मद इक्बाल याच्याविरुद्ध कलम ४२0, ४६८, ४७१ नुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. या आरोपीकडून पोलिसांनी माहिती घेतली असता सदर प्रकरणामध्ये जिल्हा परिषदेतील वर्ग-१ दर्जाचा एक अधिकारीही सहभागी असल्याची कबुली पोलिसांसमोर दिल्याची विश्‍वसनीय माहिती आहे. त्यामुळे पोलिसांनी आता या अधिकार्‍यावर कारवाई करण्याची गरज असून, अधिकार्‍याची सखोल चौकशी केल्यास युवकांची फसवणूक करणारी टोळीच समोर येण्याची शक्यता आहे.

Web Title: Zilla Parishad officials participate in cheating case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.