जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायतींना मिळणार पुरस्कार!
By admin | Published: August 21, 2015 01:10 AM2015-08-21T01:10:09+5:302015-08-21T01:10:09+5:30
राज्याला २ कोटी ९१ लाखांचा निधी मंजूर.
अकोला : यशवंत पंचायतराज अभियानांतर्गत उत्कृष्ट कामगिरी करणार्या राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायतींच्या पाठीवर कौतुकाची थाप ठेवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून, या स्थानिक स्वराज्य संस्थांना पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. त्यासाठी २ कोटी ९१ लाख रुपयांचा निधीची तरतुद १२ ऑगस्ट रोजी करण्यात आली. पुढील वर्षांंतील १२ मार्च रोजी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यातील ग्रामीण भागात स्थानिक स्वराज्य संस्था ग्राम विकासासाठी मोलाची कामगिरी करीत आहेत. ग्राम विकासाच्या योजना स्वराज्य संस्था ग्रामीण भागात राबवित आहेत. म्हणूनच शासनाच्या पंचायत विभागातर्फे या स्थानिक स्वराज्य संस्थांना प्रोत्साहित करण्यासाठी मागील २00६ पासून, जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायतींना पुरस्कार देऊन गौरविले जात आहे. राज्य आणि विभाग स्तरावर उत्कृष्ट काम करणार्या स्वराज्य संस्थांचा यात समावेश असतो. यात अशा जिल्हा परषिद, पंचायत समिती व ग्रामपंचायतींना रोख रक्कम देऊनही प्रोत्साहित करण्यात येत असते. राज्यातील अनेक जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायतींनी उत्कृष्ट कामगिरी क रू न जनतेला शासनाच्या सेवा पुरविल्या आहेत. अनेक ग्रामपंचायतींनी गोदरीमुक्त गावासह गावात अनेक विकासाची कामे केली आहेत. त्या सर्व पंचायत राज संस्थांना केंद्र व राज्य शासनाच्यावतीने विविध पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. निर्मल ग्राम योजनेंतर्गत विकासाची कामे राबविण्यात आली आहेत.