जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीच्या मोर्चेबांधणीला गती!

By Admin | Published: June 28, 2016 02:25 AM2016-06-28T02:25:06+5:302016-06-28T02:25:06+5:30

शिवसेना-भाजपची आज बैठक : भारिपचे सदस्य जाणार अज्ञात स्थळी.

Zilla Parishad president's choice to speed up the movement! | जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीच्या मोर्चेबांधणीला गती!

जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीच्या मोर्चेबांधणीला गती!

googlenewsNext

अकोला: जिल्हा परिषदेच्या नवीन अध्यक्ष-उपाध्यक्षांच्या निवडीसाठी दोन दिवसांचा कालावधी उरला आहे. त्यानुषंगाने राजकीय पक्षांच्या मोर्चेबांधणीला गती आली आहे. त्यामध्ये शिवसेना-भाजप युतीच्या जिल्हा परिषद सदस्यांची बैठक मंगळवारी होणार असून, भारिप बहुजन महासंघाचे सदस्य अज्ञात स्थळी रवाना होणार आहेत. जिल्हा परिषदेच्या विद्यमान अध्यक्ष व उपाध्यक्षांचा अडीच वर्षांचा कालावधी ३0 जून रोजी संपत आहे. या पृष्ठभूमीवर जिल्हा परिषद नवीन अध्यक्ष व उपाध्यक्षांची निवड ३0 जून रोजी करण्यात येणार आहे. अध्यक्ष-उपाध्यक्षांची निवड करण्यास केवळ दोन दिवसांचा कालावधी उरला असल्याच्या स्थितीत जिल्हा परिषदेतील राजकारण तापू लागले आहे. त्यामध्ये जिल्हा परिषदेतील विद्यमान सत्ताधारी भारिप-बमसंचे सदस्य मंगळवारी सायंकाळपर्यंत अज्ञात स्थळी रवाना होण्याची शक्यता आहे. तर जिल्हा परिषदेत भारिप-बमसंला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी सुरू झालेल्या मोर्चेबांधणीत शिवसेना-भाजप युतीच्या जिल्हा परिषद सदस्यांची बैठक मंगळवारी बोलविण्यात आली आहे. अध्यक्ष-उपाध्यक्षांच्या निवडीबाबत रूपरेषा ठरविण्यासाठी बोलविण्यात आलेल्या या बैठकीला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह दोन अपक्ष सदस्यांनाही बोलविण्यात आले आहे.

Web Title: Zilla Parishad president's choice to speed up the movement!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.