जिल्हा परिषदेच्या शाळा शिक्षकांनी केल्या स्वच्छ, झाडे-झुडपेही काढली!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:20 AM2021-09-19T04:20:28+5:302021-09-19T04:20:28+5:30
आकडेवारी काय सांगते? तालुका जि.प. प्राथमिक शाळा ...
आकडेवारी काय सांगते?
तालुका जि.प. प्राथमिक शाळा शिक्षक
अकोला- ३९
अकोट- ९६
बाळापूर- ६४
बार्शीटाकळी- ४४
मूर्तिजापूर- ४६
पातूर- ५९
तेल्हारा- १४४
वर्गखोल्यांमधील धूळ हटेना
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व माध्यमिक विभागाच्या ९१२ शाळा आहेत. या शाळांमध्ये शिक्षक जात असून, त्यांनी शाळांची स्वच्छता करून झाडे-झुडपे काढली. परंतु विद्यार्थी शाळेत जात नसल्यामुळे वर्गखोल्या बंद आहेत. या वर्गखोल्यांची साफसफाई होत नसल्याने, मोठी धूळ साचली आहे.
जबाबदारी कोणाची?
शाळा स्वच्छ करण्याची जबाबदारी ही शाळेतील शिक्षक, मुख्याध्यापकांची आहे. त्यासाठी शाळांना मेंटनन्स निधीसुद्धा दिला जातो. या निधीतून त्यांनी शाळेची स्वच्छता करावी. तसेच जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शाळा व्यवस्थापन समितीसुद्धा कार्यरत आहे. या समितीच्या देखरेखीखाली शाळेचा कारभार चालतो.
शिक्षकांची उपस्थिती किती?
शाळा बंद असल्या तरी शिक्षकांना शाळेत जावे लागत आहे. त्यांच्या उपस्थितीचा आढावा गटशिक्षणाधिकारी स्तरावरून घेतला जातो. शाळांमध्ये प्राथमिक शिक्षकांना १०० टक्के उपस्थिती बंधनकारक केली आहे. काही अपवाद वगळता, शाळांमध्ये १०० टक्के शिक्षकांची उपस्थित राहत आहे.
जिल्हा परिषदेच्या शाळा सुरू करण्यात आल्यावर सर्वप्रथम शिक्षक, मुख्याध्यापकांनी शाळा स्वच्छ केल्या. विद्यार्थी शाळेत जात नसल्याने, वर्गखोल्यांमध्ये मात्र धूळ साचली आहे. १५ ऑगस्टपूर्वी शिक्षकांनी शाळांची, परिसराची स्वच्छता केली.
-डॉ. वैशाली ठग, शिक्षणाधिकारी प्राथमिक