जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचा पोळा फुटला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2020 10:45 AM2020-08-02T10:45:58+5:302020-08-02T10:46:20+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क अकोला : जिल्हा परिषद अंतर्गत विविध विभागातील कर्मचाऱ्यांच्या सार्वत्रिक प्रशासकीय व विनंतीवरील बदल्यांचा पोळा शुक्रवारी फुटला. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : जिल्हा परिषद अंतर्गत विविध विभागातील कर्मचाऱ्यांच्या सार्वत्रिक प्रशासकीय व विनंतीवरील बदल्यांचा पोळा शुक्रवारी फुटला. समुपदेशनाद्वारे बदली प्रक्रियेच्या पहिल्या दिवशी (शुक्रवारी) १३ कर्मचाºयांच्या बदल्या करण्यात आल्या. त्यामध्ये ४ प्रशासकीय व ९ कर्मचाºयांच्या विनंतीवरून बदल्या करण्यात आल्या.
जिल्हा परिषद अंतर्गत वर्ग -३ व वर्ग -४ मधील कर्मचाºयांच्या प्रशासकीय व विनंतीवरील बदल्यांची प्रक्रिया ३१ जुलैपासून सुरू करण्यात आली. जिल्हा परिषद सभागृहात समुपदेशनाद्वारे सहा विभागातील कर्मचाºयांच्या बदल्यांची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. कृषी, बांधकाम, लघुसिंचन, अर्थ, पाणीपुरवठा व पशुसंवर्धन इत्यादी सहा विभागातील १३ कर्मचाºयांच्या बदल्या करण्यात आल्या. त्यामध्ये ४ कर्मचाºयांच्या प्रशासकीय व ९ कर्मचाºयांच्या बदल्या विनंतीवरून करण्यात आल्या. जिल्हा परिषद अध्यक्ष प्रतिभा भोजने, मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, संबंधित विभागाचे सभापती व विभाग प्रमुख अधिकाºयांच्या उपस्थितीत समुपदेशनाद्वारे कर्मचाºयांच्या बदल्या करण्यात आल्या.
शिक्षकांच्या बदल्यांचे मंगळवारी ठरणार नियोजन!
जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या बदली प्रक्रियेचे नियोजन मंगळवारी ठरविण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) संबंधित विभागाचे अधिकारी आणि पदाधिकाºयांची बैठक घेणार असून, या बैठकीत जिल्ह्यातील बदलीपात्र प्राथमिक शिक्षकांच्या बदली प्रक्रियेचे नियोजन निश्चित करण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषद शिक्षण सभापती चंद्रशेखर पांडे गुरुजी यांनी सांगितले.
विभागनिहाय अशा आहेत बदल्या!
जिल्हा परिषद कृषी विभागातील १ विस्तार अधिकारी, लघुसिंचन विभागातील १ शाखा अभियंता, बांधकाम विभागातील विभागातील १ कनिष्ठ अभियंता व २ स्थापत्य अभियांत्रिकी सहायक, अर्थ विभागातील १ कनिष्ठ सहायक लेखा व २ वरिष्ठ सहायक लेखा, पाणीपुरवठा विभागातील १ कनिष्ठ अभियंता आणि पशुसंवर्धन विभागातील १ सहायक पशुधन विकास अधिकारी व ३ पशुधन पर्यवेक्षक इत्यादी कर्मचाºयांच्या बदल्या करण्यात आल्या.
चार मोठ्या विभागातील बदल्या ५ आॅगस्टला!
जिल्हा परिषद कर्मचाºयांच्या बदली प्रक्रियेत आरोग्य, पंचायत, शिक्षण व सामान्य प्रशासन इत्यादी चार मोठ्या विभागातील कर्मचाºयांच्या बदल्या ५ आॅगस्ट रोजी करण्यात येणार आहेत.