हगणदरीमुक्तीसाठी जिल्हा परिषदेचा ‘टी विथ रनर्स’ उपक्रम

By admin | Published: May 30, 2016 02:18 AM2016-05-30T02:18:39+5:302016-05-30T02:18:39+5:30

उत्कृष्ट कार्य करणार्‍या सरपंचांना ‘व्हीआयपी’ कार्ड देणार!

Zilla Parishad's 'T.W. Runners' initiative for the release of elephants | हगणदरीमुक्तीसाठी जिल्हा परिषदेचा ‘टी विथ रनर्स’ उपक्रम

हगणदरीमुक्तीसाठी जिल्हा परिषदेचा ‘टी विथ रनर्स’ उपक्रम

Next

वाशिम: जिल्ह्यात हगणदरीमुक्तीसाठी गावागावांमध्ये काम करणार्‍या नागरिकांचा जिल्हा परिषदेच्यावतीने सन्मान करण्यात येणार आहे. ग्रामीण भागात हगणदरीमुक्तीसाठी काम करणार्‍यांना जिल्हा परिषदेच्या सीईओंसोबत चहा घेण्याकरिता आमंत्रित करण्यात येणार आहे. जिल्हा परिषद सभागृहात २८ मे रोजी पार पडलेल्या एका कार्यक्रमात हा निर्णय घेण्यात आला. जिल्ह्यातील बिडीओ आणि विस्तार अधिकारी यांच्या पुढाकाराने ह्यटी विथ रनर्सह्ण उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमात आपले गाव हगणदरीमुक्त करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार्‍या, त्यासाठी धावपळ करणार्‍या गावस्तरीय पदाधिकारी, कर्मचारी व अन्य कार्यकर्ते यांना मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील यांच्या कक्षात चहासाठी आमंत्रित करण्यात येणार आहे व गाव हगणदरीमुक्त करण्याबाबत चर्चा करण्यात येणार आहे. तसेच या क्षेत्रात चांगले काम करणार्‍या सरपंचांना ह्यव्हीआयपीह्ण कार्ड देण्यात येणार आहे.
स्वच्छ भारत मिशन जिल्हा परिषद वाशिमच्यावतीने समुदाय संचालित हगणदरी निर्मूलन कृती आराखडा उजळणी प्रशिक्षण कार्यक्रम २८ मे रोजी जिल्हा परिषद सभागृहात पार पडला. या सभागृहात पाणी व स्वच्छता सहाय्य संस्था मुंबई वासोचे विभागीय समन्वयक अरुण रसाळ यांनी मार्गदर्शन केले. गावाला हगणदरीमुक्त करण्यापूर्वी त्या गावाचा समुदाय संचलित हगणदरी निर्मूलन कृती आराखडा बनविणे आवश्यक असल्याचे मत रसाळ यांनी व्यक्त केले.

Web Title: Zilla Parishad's 'T.W. Runners' initiative for the release of elephants

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.