जि.प. निवडणुकीत मतपत्रिका वापरा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2017 02:58 AM2017-08-11T02:58:21+5:302017-08-11T02:58:21+5:30

अकोला : देशभरात सर्वत्र मतदान यंत्रामध्ये मोठा घोटाळा झाल्याने  पात्र उमेदवारांना डावलण्याचा प्रकार घडला. त्यातून सर्वसामान्यांचा  लोकशाहीवरचा विश्‍वासच उडण्याची भीती निर्माण झाली आहे.  त्यामुळे यापुढे होणार्‍या निवडणुकांत मतदान यंत्राऐवजी मतपत्रिकेचा  वापर करण्याचा ठराव जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत घेण्यात  आला. तो केंद्र आणि राज्य निवडणूक आयोगाकडे पाठवला जाणार  आहे. 

Zip Use ballot in elections! | जि.प. निवडणुकीत मतपत्रिका वापरा!

जि.प. निवडणुकीत मतपत्रिका वापरा!

Next
ठळक मुद्दे‘ईव्हीएम’चा घोटाळा रोखण्यासाठी जि.प.चा ठराव

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : देशभरात सर्वत्र मतदान यंत्रामध्ये मोठा घोटाळा झाल्याने  पात्र उमेदवारांना डावलण्याचा प्रकार घडला. त्यातून सर्वसामान्यांचा  लोकशाहीवरचा विश्‍वासच उडण्याची भीती निर्माण झाली आहे.  त्यामुळे यापुढे होणार्‍या निवडणुकांत मतदान यंत्राऐवजी मतपत्रिकेचा  वापर करण्याचा ठराव जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत घेण्यात  आला. तो केंद्र आणि राज्य निवडणूक आयोगाकडे पाठवला जाणार  आहे. 
लगतच्या बुलडाणा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत मतदान यंत्रात  मोठा घोळ झाल्याचे खुद्द प्रशासनानेच मान्य केले आहे. लोणार  तालुक्यातील सुलतानपूर गटात हा घोळ उघड झाला. मतदान यंत्राचे  कोणतेही बटण दाबले तरी मत भाजपच्या उमेदवारालाच जात  असल्याचा अहवाल आहे. त्यातून मतदान यंत्र हॅक होत असल्याचे  सत्य उघड झाले आहे. येत्या काळात अकोला, वाशिम जिल्हा  परिषदांच्या निवडणुका होणार आहेत. त्या निवडणुकीत उमेदवारांसह  मतदारांचाही विश्‍वास कायम ठेवण्यासाठी मतपत्रिकेद्वारेच मतदान  घ्यावे, असा ठराव सदस्य, भारिप-बमसं महिला आघाडी अध्यक्ष प्र ितभा अवचार यांनी सभेत मांडला. सभागृहातील सर्वपक्षिय सदस्यांनी  त्यावर होकार दर्शवत ठरावाला मान्यता दिली. हा ठराव सभेच्या  कामकाजात घेऊन अकोला जिल्हा परिषद सदस्यांच्या मागणीचा  विचार व्हावा, असा प्रस्ताव केंद्र आणि राज्याच्या निवडणूक  आयोगाकडे पाठवण्याचेही सदस्यांनी सभेत सांगितले. 

Web Title: Zip Use ballot in elections!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.