झोंटिंग महाराजांचा महोत्सव रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 04:19 AM2021-04-11T04:19:02+5:302021-04-11T04:19:02+5:30
----------------------------------------- वन्यप्राण्यांची पाण्याच्या शोधात नागरी वस्तीकडे धाव आगर : वन्यप्राणी पाण्याच्या शोधात नागरी वस्त्यांकडे धाव घेत आहेत. परिसरात असलेल्या ...
-----------------------------------------
वन्यप्राण्यांची पाण्याच्या शोधात नागरी वस्तीकडे धाव
आगर : वन्यप्राणी पाण्याच्या शोधात नागरी वस्त्यांकडे धाव घेत आहेत. परिसरात असलेल्या चोंडा, मोळखंड व चिंचखेड शेत तलावातील पाणी आटल्याने प्राणी गाव वस्तीकडे धाव घेत आहे. त्यामुळे वनविभागाने पाणवठे निर्माण करण्याची मागणी होत आहे.
----------------------------------
माझोड-वाडेगाव रस्त्याची दुरवस्था
माझोड : माझोड-वाडेगाव रस्त्यावर खड्यांचे साम्राज्य निर्माण झाल्यनाने वाहनधारक त्रस्त झाले आहेत. रस्त्याचे काम सुरू करण्याची मागणी पांडुरंग बंड, विनोद ताले, देवानंद खंडारे, राजेश ठाकरे, प्रकाश पाटील,रणजित खंडारे, राजेश ताले, प्रमोद खंडारे, नितेश बराटे, महेश ढोरे, श्रीकृष्ण खंडारे, अमोल काळे, शिवलाल ताले, विपुल खंडारे आदींनी केली आहे.
--------------------------------------------
श्रामनेर शिबिरार्थींना भोजनदान
माझोड : भरतपूर येथे सुरू असलेल्या श्रामनेर शिबिरार्थींना माझोड येथील प्रेमानंद खंडारे यांच्या निवासस्थानी भोजनदान देण्यात आले. प्रारंभी सम्राट अशोक बुद्धविहारात श्रामनेर भन्ते यांचे आगमन झाले. येथे बुद्धवंदना झाल्यानंतर संघ खंडारे यांच्या येथे आला. भोजनदानानंतर भदन्त बुद्धपाल यांनी धम्म प्रवचन केले. यावेळी बुद्ध उपासक देवानंद खंडारे, रणजित खंडारे, सिध्दार्थ खंडारे, नाजूक खंडारे, जयंत खंडारे, सुनील अंभोरे, प्रेमानंद खंडारे, कविता खंडारे आदींसमवेत इतर मान्यवर उपस्थित होते.
----------------------------------------------------
रस्त्यालगत भाजीविक्रेत्यांचा ठिय्या
वाडेगाव : शहरातील प्रमुख रस्त्यांवर तसेच चौकालगत भाजी, फळ तसेच कपडे विक्रेत्यांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे वाहतुकीस अडथळा ठरत आहे. त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाने अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबविण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
----------------------------------------------
बसस्थानक परिसरात स्वच्छतेचा अभाव
अकोट : येथील बसस्थानक परिसरात गत काही दिवसांपासून स्वच्छतेचा अभाव दिसून येत आहे. स्वच्छतेकडे दुर्लक्ष केले जात असल्याने घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे प्रवाशांसह चालक-वाहकांचे आरोग्य धोक्यात सापडले आहे. याकडे संबंधित विभागाने लक्ष देऊन स्वच्छता करण्याची मागणी होत आहे.
-------------------------------------------
खाद्य तेलाचे भाव गगनाला
बाळापूर : गेल्या वर्षीपासून कोरोनाच्या संसर्गामुळे देशात आर्थिक समस्या निर्माण झाली आहे. वाढत्या महागाईमुळे नागरिकांचे अक्षरश: कंबरडे मोडले आहे. दैनंदिन वापरात येणाऱ्या खाद्यतेलाचे भाव गगनाला भिडले असून, तेलाच्या भावात ६० रुपयांनी वाढ झाली आहे.
----------------------------
ग्रामीण भागातही कोरोनाचा उद्रेक
बार्शीटाकळी : गेल्या पंधरवड्यापासून कोरोना रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. सुरुवातीला शहरी भागात रुग्ण आढळून येत होते. आता ग्रामीण भागातदेखील कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने आढळून येत असल्याचे दिसून येत आहे. शनिवारी प्राप्त अहवालानुसार तालुक्यातील वरखेड येथे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला आहे.
-----------------------------------
अकोट परिसरात अवकाळी पाऊस
अकोट : परिसरात शनिवारी रात्रीच्या सुमारास अवकाळी पावसाने हजेरी लावली. परिसरात सद्यस्थितीत उन्हाळी पिके व भाजीपाला वर्गीय पिके बहरलेली आहेत. अवकाळी पावसाने भाजीपाला पिकांना फटका बसणार असल्याने शेतकरी चिंतातुर झाले होते. दरम्यान, अवकाळी पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाला होता.