जि.प.बांधकाम समितीच्या सभेत अंदाजपत्रकास मान्यता!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 04:19 AM2021-02-13T04:19:02+5:302021-02-13T04:19:02+5:30
अकोला : जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या २०२०-२१ या आर्थिक वर्षातील सुधारित आणि २०२१-२२ या आर्थिक वर्षातील प्रस्तावित अंदाजपत्रकास जिल्हा ...
अकोला : जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या २०२०-२१ या आर्थिक वर्षातील सुधारित आणि २०२१-२२ या आर्थिक वर्षातील प्रस्तावित अंदाजपत्रकास जिल्हा परिषद बांधकाम समितीच्या सभेत शुक्रवारी मान्यता देण्यात आली. सेस फंडातून ग्रामीण रस्ते मुरुमीकरण करण्याच्या कामांना सभेत मंजुरी देण्यात आली.
जिल्हा परिषद उपकर (सेस फंड) अंतर्गत जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रस्ते मुरुमीकरणाच्या कामांसह ग्रामीण भागातील रस्ते देखभाल व दुरुस्तींची कामे मंजूर करण्यात आली. तसेच पातूर तालुक्यातील सस्ती जोड रस्ता कामासाठी स्वीकृतीस या सभेत मंजुरी देण्यात आली. जिल्हा परिषद शिक्षण व बांधकाम सभापती चंद्रशेखर पांडे गुरुजी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेला समितीचे सदस्य पवन बुटे, विनोद देशमुख, सुनीता गोरे, लता पवार, मीरा पाचपोर, प्रमोदिनी कोल्हे, सुनील धाबेकर, सुलभा दुतोंडे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.