पाण्यासाठी पाळोदी-गोत्राच्या महिलांची जि.प. वर धडक!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2017 01:34 AM2017-09-09T01:34:59+5:302017-09-09T01:34:59+5:30
अकोला : नवीन जलवाहिनी टाकून गावाला पाणी पुरवठा करण्याच्या मागणीसाठी पाळोदी व गोत्रा येथील महिलांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषदेवर धडक मोर्चा काढला.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : नवीन जलवाहिनी टाकून गावाला पाणी पुरवठा करण्याच्या मागणीसाठी पाळोदी व गोत्रा येथील महिलांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषदेवर धडक मोर्चा काढला.
अकोला तालुक्यातील गोपालखेड पाणीपुरवठा योजनें तर्गत पाळोदी व गोत्रा या दोन गावांना पाणीपुरवठा करण्यात येत होता; मात्र पाणीपुरवठय़ाची जलवाहिनी जुनी आणि शिकस्त झाल्याने पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे.
त्यामुळे गत तीन-चार महिन्यांपासून पाळोदी व गोत्रा या दोन्ही गावात पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाली असून, पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना पायपीट करावी लागत आहे. त्यामुळे गोपालखेडपासून पाळोदी-गोत्रापर्यंत नवीन जलवाहिनी टाकून तातडीने जलवाहिनी टाकण्यात यावी आणि गावांना पाणीपुरवठा करण्याची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी करी त पाळोदी व गोत्रा येथील महिलांनी जिल्हा परिषद व जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला. मागणीचे निवेदन निवासी जिल्हाधिकारी आस् ितककुमार पांडेय आणि जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाला देण्यात आले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख नितीन देशमुख, उपजिल्हाप्रमुख गोपाल दातकर यांच्यासह पाळोदी-गोत्राच्या सरपंच सूर्यकांता अहिर, उपसरपंच सुनीता वक्टे, निर्मला तराळे, वच्छला तराळे, सुमन तराळे, गीता टिकार, नलिनी वक्टे, मनकर्णा वक्टे, संगीता वक्टे, सीमा वक्टे, सीता वक्टे, सुशीला ढोले, लीला वाळसे, ताई वाळसे, कमला वक्टे, नंदा तायडे, महानंदा गोपनारायण, पुष्पा वक्टे, सरस्वता ढोले, रेखा शिरसाट, अरुणा पाटील, दीपाली वक्टे इतर महिला उपस्थित होत्या.
तात्पुरती पूरक नळ योजना करणार- जिल्हाधिकारी
पाळोदी-गोत्रा या गावांना लोणाग्रा येथील विहिरीवरून पाणीपुरवठा करण्यासाठी तात्पुरती पूरक नळ योजना करण्यात येणार असल्याचे आश्वासन जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी मोर्चेकरी महिलांना दिले. तात्पुरती पूरक नळ योजनेचा प्रस्ताव सादर करण्याचेही जिल्हाधिकार्यांनी सांगितले.