जि.प., पं.स. निवडणुकीवर नकाशी ग्रामस्थांचा बहिष्कार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:14 AM2021-07-08T04:14:16+5:302021-07-08T04:14:16+5:30
वाडेगाव : बाळापूर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती गणातील निवडणुकीवर बहिष्कार व उमेदवारांच्या प्रचार करण्यासाठी गावबंदी ...
वाडेगाव : बाळापूर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती गणातील निवडणुकीवर बहिष्कार व उमेदवारांच्या प्रचार करण्यासाठी गावबंदी करण्याबाबत निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे नकाशी येथील ग्रामस्थांकडून निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे निवेदन देण्यात आले आहे.
वाडेगाव-अकोला पालखी मार्गाची दुरुस्ती करण्यासाठी अनेकदा विनंती अर्ज, तक्रारीचे निवेदन, आंदोलन, रस्ता रोको करण्यात आला. परंतु आश्वासन देऊन शासकीय अधिकारी व कंत्राटदार यांनी वेळ मारून नेली. त्यामुळे होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतल्याचे निवेदनात म्हटले आहे. नकाशी गावामध्ये प्रचारासाठी येणाऱ्या उमेदवारांना व त्यांच्या सहकाऱ्यांना गावबंदी करण्यात येणार आहे. त्यांनी जबरदस्ती केल्यास गावकऱ्यांचा रोषाला बळी पडल्यास त्यांची सर्वस्व जबाबदारी आपली राहील, असे या निवेदनात म्हटले आहे.
रस्त्याचे काम रखडले.
वाडेगाव-अकोला मार्ग मागील तीन-चार वर्षांपूर्वी रखडला आहे. परिणामी या रस्त्यावरून जाताना ग्रामस्थांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. अपघातसुद्धा वाढले आहे. रस्त्याची दुरुस्ती होत नसल्याने ग्रामस्थांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे.
-ज्योत्स्ना रवींद्र मुरूमकार, सरपंच नकाशी
रस्त्याच्या दुरुस्तीबाबत अनेकदा तक्रार देऊनसुद्धा प्रशासनाने दखल घेतली नाही. केवळ आश्वासने दिली. त्यामुळे आम्ही निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे.
- डॉ. ऋषल गणोरकार,
उपसरपंच नकाशी
फोटो: