जि.प., पं.स. निवडणूक; ‘आॅनलाइन’ भरावे लागणार उमेदवारी अर्ज!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2019 12:07 PM2019-11-22T12:07:55+5:302019-11-22T12:08:05+5:30

आॅनलाइन उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उमेदवारांना अडचणी येऊ नये, यासाठी तालुका स्तरावर तांत्रिक तज्ज्ञांची पथके कार्यान्वित करण्यात येणार आहेत.

ZP, Pt. Election; Candidate form to be filled online! | जि.प., पं.स. निवडणूक; ‘आॅनलाइन’ भरावे लागणार उमेदवारी अर्ज!

जि.प., पं.स. निवडणूक; ‘आॅनलाइन’ भरावे लागणार उमेदवारी अर्ज!

Next

अकोला : जिल्हा परिषद व जिल्ह्यातील सातही पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची १८ डिसेंबरपासून सुरुवात होणार असून, राज्य निवडणूक आयोगामार्फत तयार करण्यात आलेल्या संगणकीय प्रणालीतूनच उमेदवारांना ‘आॅनलाइन’ उमेदवारी अर्ज व शपथपत्र भरावे लागणार आहेत. आॅनलाइन भरलेल्या उमेदवारी अर्जाची प्रत संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सादर करावी लागणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी गुरुवारी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. जिल्हा परिषद व त्यांतर्गत जिल्ह्यातील सातही पंचायत समित्यांच्या निवडणूक कार्यक्रमाची माहिती देत, निवडणुकीची जिल्ह्यातील ग्रामीण भागात आचारसंहिता लागू करण्यात आली असून, आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज व शपथपत्र सहज रीतीने भरता यावे, यासाठी राज्य निवडणूक आयोगाने महाआॅनलाइनच्या मदतीने एक सॉफ्टवेअर तयार करण्यात आले असून, या सॉफ्टवेअरद्वारे उमेदवारांनी उमेदवारी अर्ज व शपथपत्र भरणे आवश्यक आहे. आॅनलाइन भरलेल्या उमेदवारी अर्जाची प्रिंट काढून निवडणूक निर्णय अधिकाºयांकडे दाखल करावी लागणार आहे. आॅनलाइन उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उमेदवारांना अडचणी येऊ नये, यासाठी तालुका स्तरावर तांत्रिक तज्ज्ञांची पथके कार्यान्वित करण्यात येणार आहेत. जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी जिल्ह्यातील १ हजार १७ मतदान केंद्रांवर मतदान घेण्यात येणार असून, मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी म्हणून ६ हजार ७१० अधिकारी-कर्मचाºयांची नेमणूक करण्यात आली आहे, असेही जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सांगितले. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर व निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे उपस्थित होते.


जि.प. गटांचे प्रवर्गनिहाय असे आहे आरक्षण!
४जिल्हा परिषदेचे एकूण ५३ गट असून, त्यामध्ये अनुसूचित जाती-६, अनुसूचित जाती स्त्री-६, अनुसूचित जमाती-२, अनुसूचित जमाती स्त्री-३, नागरिकांचा मागास प्रवर्ग (नामाप्र)-७, नामाप्र स्त्री-७ आणि सर्वसाधारण-११ व सर्वसाधारण स्त्री प्रवर्गासाठी ११ गट आरक्षित आहेत

 

Web Title: ZP, Pt. Election; Candidate form to be filled online!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.