जि.प. स्थायी समितीच्या सभेत विविध ठराव मंजूर !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:40 AM2021-09-02T04:40:33+5:302021-09-02T04:40:33+5:30
जिल्हा परिषद स्थायी समितीच्या सभेत सहा ठरावांना मंजुरी देण्यात आली. त्यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाची २०२१-२२ या वर्षासाठीची राज्य ...
जिल्हा परिषद स्थायी समितीच्या सभेत सहा ठरावांना मंजुरी देण्यात आली. त्यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाची २०२१-२२ या वर्षासाठीची राज्य दरसूची जिल्हा परिषदेला लागू करणे, लघु पाटबंधारे योजना व कोल्हापुरी बंधारे योजनेंतर्गत कामांच्या देयकामधून कपात केलेल्या सुरक्षा ठेवच्या देयकास तीन वर्षांपेक्षा अधिक कालावधी झाल्याने नियम ४५ नुसार मंजुरी, दिव्यांगांसाठी राखीव पाच टक्के राखीव निधीतून समाजकल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या दिव्यांग लाभार्थींना उद्योग उभारणीसाठी आर्थिक मदत योजनेला प्रशासकीय मान्यता, बाळापूर तालुक्यातील झुरळ बु. ते झुरळ खुर्द ग्रामीण मार्गावरील नवीन रपट्याच्या बांधकामास प्रशासकीय मान्यता, समाजकल्याण विभागामार्फत शंभर टक्के अनुदानावर मागासवर्गीय लाभार्थींना ओव्हरलाॅक शिलाई मशीन वाटप करणे आणि जिल्हा परिषद आबासाहेब खेडकर सभागृहाची दुरुस्ती इत्यादी ठरावांना मंजुरी देण्यात आली.