‘सेल्फी’च्या मुद्यावरून जिल्हा परिषद सदस्य आक्रमक
By admin | Published: February 29, 2016 02:33 AM2016-02-29T02:33:24+5:302016-02-29T02:33:24+5:30
सेल्फीची सक्ती तातडीने मागे घेण्यात यावी, यासाठी निवेदन देण्यात येणार.
अकोला - जिल्हा परिषदेच्या माध्यमिक व प्राथमिक शाळेतील शिक्षकांना हजेरी लावताना ह्यसेल्फीह्णची सक्ती करण्यात आली असून, हा प्रकार महिला शिक्षिकांचे हनन करणारा असल्याने या प्रकाराला जिल्हा परिषद सदस्यांनी विरोध केला आहे. एकाही शिक्षिकेने सेल्फी काढून ती पाठवू नये, असे आवाहन जिल्हा परिषद सदस्य नितीन देशमुख व जिल्हा परिषद सदस्य रेणुका गोपाल दातकर यांनी केले आहे. या प्रकाराला आता शिक्षक संघटनांनीही विरोध दर्शविला असून, सेल्फीची सक्ती तातडीने मागे घेण्यात यावी, यासाठी निवेदन देण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. माध्यमिक व प्राथमिक शाळेतील शिक्षक शाळेत ठरवून दिलेल्या वेळेत पोहोचले किंवा नाही, याची तपासणी करण्यासाठी शिक्षण विभागाने जिल्हय़ातील शिक्षकांना सेल्फी काढून ती केंद्रप्रमुखांमार्फत वरिष्ठांपर्यंत पोहोचविण्याचा नियमच सुरू केला होता. पुरुष शिक्षकांना सेल्फीची काही अडचण नसली तरी महिला शिक्षिकांना मात्र सेल्फीची अडचण निर्माण झाल्याने तसेच त्यांच्या घरात कलह होत असल्याने अनेक शिक्षिकांनी या सेल्फीला विरोध केला. मात्र, वरिष्ठांच्या आदेशाला विरोध करण्याची हिंमत कुणाला नसल्याने हा प्रकार नित्यनेमाने सुरूच होता. महिला शिक्षिकांच्या सेल्फीचा दुरुपयोग होण्याचेही प्रकार सुरू झाल्याने त्यांनी हा प्रकार शिक्षक संघटनांपर्यंत पोहोचविला.