9 महिन्यात एसटीचे उत्पन्न 149 कोटी, 1 करोड रुपयाची वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2020 08:01 PM2020-01-18T20:01:38+5:302020-01-18T20:16:42+5:30
१४७ कोटींचे उत्पन्न : विभाग नियंत्रकांची माहिती
अमरावती : गतवर्षीच्या तुलनेत यंदा नऊ महिन्यांत राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अमरावती जिल्ह्यातील उत्पन्नात एक कोटींची वाढ झाली असल्याची माहिती विभाग नियंत्रक श्रीकांत गभणे यांनी दिली. यंदा अमरावती जिल्ह्यात एसटीने १४७ कोटी २९ लक्ष रुपयांची कमाई केली. सदर उत्पन्न १ एप्रिल ते ३१ डिसेंबर २०१९ या नऊ महिन्यांतील आहे. गतवर्षी याच कालावधीत १४६.१३ कोटींची कमाई झाली होती. गतवर्षीच्या तुलनेत १.१३ कोटींनी उत्पन्न वाढले आहे.
खासगी वाहनांच्या तुलनेत एसटीच्या ‘लाल परी’चा प्रवास प्रवाशांना सुरक्षित वाटतोे. जिल्ह्यातील विविध आगारांच्या ताफ्यात ४५ शिवशाही बससुद्धा दाखल झाल्या असल्याने अमरावती-नागपूरकरिता सर्वाधिक शिवशाही बस अमरावती मध्यवर्ती आगारातून सोडण्यात येतात. इतर तालुक्यांच्या ठिकाणीसुद्धा शिवशाहीच्या फेऱ्या आहेत. अमरावती जिल्ह्यात एकूण आठही आगारांतून एकूण ४२५ बस रस्त्यावर धावत आहेत.
जिल्ह्यात एसटीचे उत्पन्न नऊ महिन्यांत १.१३ कोटींनी वाढले आहे. इतर वाहनांच्या तुलनेत एसटीचा प्रवास सुरक्षित आहे. प्रवाशांना चांगलीच सेवा देण्याचा प्रयत्न असतो.
- श्रीकांत गभणे, विभाग नियंत्रक, अमरावती