जुलैमध्ये तापाचे ११७१, टायफॉइडचे २८१ रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2019 10:30 PM2019-08-05T22:30:12+5:302019-08-05T22:30:39+5:30

जिल्ह्यात वातावरणातील बदलांमुळे व्हायरल फिव्हरने नागरिकांना हैराण करून टाकले आहे. जुलै महिन्याच्या ३० दिवसांत जिल्हा सामान्य रुग्णालयात तापाचे १ हजार १७१, तर टायफॉइडचे तब्बल २८१ रुग्ण दाखल झाल्याने जिल्हावासी व्हायरलच्या विळख्यात असल्याचे दिसून येत आहे.

1 fever in July, 2 typhoid patients | जुलैमध्ये तापाचे ११७१, टायफॉइडचे २८१ रुग्ण

जुलैमध्ये तापाचे ११७१, टायफॉइडचे २८१ रुग्ण

googlenewsNext
ठळक मुद्देजिल्हा व्हायरल फिव्हरने त्रस्त : वातावरण बदलाने आजारात वाढ

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्ह्यात वातावरणातील बदलांमुळे व्हायरल फिव्हरने नागरिकांना हैराण करून टाकले आहे. जुलै महिन्याच्या ३० दिवसांत जिल्हा सामान्य रुग्णालयात तापाचे १ हजार १७१, तर टायफॉइडचे तब्बल २८१ रुग्ण दाखल झाल्याने जिल्हावासी व्हायरलच्या विळख्यात असल्याचे दिसून येत आहे.
पावसाळ्यात जलजन्य आजारांसह सर्दी, खोकला व ताप डोके वर काढते. त्यावर घरगुती उपाय घरोघरी सुरू होतात. मात्र, ताप कोणत्या प्रकारचा आहे, हे कळणेही आता आवश्यक झाले आहे. साधारणत: ताप म्हटला की, मलेरिया, डेंग्यू किंवा टायफॉइड असण्याची शक्यता वर्तविली जात होती. मात्र, आता व्हायरल फिव्हर असल्याचे डॉक्टरही सांगू लागले आहे. मात्र, व्हायरल फिव्हरसुद्धा नागरिकांना दमकोस आणतो.
डॉक्टरांकडे जाऊन गोळ्या व औषध घेतल्यानंतर व्हायरल फिव्हर बरा व्हायचा. मात्र, अलीकडे व्हायरल फिव्हरच्याही रुग्णांनाही रुग्णालयात दाखल करण्यापर्यंत वेळ येत आहे. जून व जुलै महिन्यात जिल्हा सामान्य रुग्णालयात व्हायरल फिव्हरच्या दोन हजारांवर रुग्णांवर उपचार करण्यात आले आहे. जुलै महिन्याच्या ३० दिवसांत तर तब्बल १ हजार १७१ रुग्ण तापाचे दाखल झाले. याशिवाय तापाच्या ४५० रुग्णांच्या रक्तजल नमुन्यांची तपासणी करण्यात आली. यानंतर त्यात २८१ रुग्ण टायफॉइडने आजारी असल्याचे आढळून आले आहे. याशिवाय खासगी रुग्णालयातील संख्या यापेक्षा अधिक पटीने असल्याचे आढळून आले आहे. या व्हायरल फिव्हरने अमरावतीकरांना हैराण केले आहे.
कारण व लक्षणे
वातावरणातील बदलांमुळे व्हायरल फिव्हरचे विषाणू सक्रिय होतात. ते विषाणू श्वासोच्छवास किंवा अन्नपदार्थद्वारे शरीरात प्रवेश करतात. रक्ताद्वारे संपूर्ण शरीरात पोहोतात. सुरुवातीला तीव्र ताप, अशक्तपणा जाणवतो. घसा खवखवणे, अंगदुखी हातापायांमध्ये वेदना होणे ही प्राथमिक लक्षणे आढळतात. ताप मध्यम ते तीव्र स्वरुपाचा असू शकतो. त्यात चढ-उतारही असतो. त्यानंतर डोळ्यांना लाली येणे, डोळ्यांतून पाणी वाहणे, नाक चोंदणे, उलटी, जुलाब, अंगावर लाल पुरळ येणे अशा प्रकारची लक्षणे दिसू लागतात.
अशी घ्यावी काळजी
स्वच्छता आणि राहणीमानाच्या सवयी बदलल्यास व्हायरल फिव्हर टाळता येऊ शकतो. दूषित पदार्थांचे सेवन टाळणे, स्वच्छता राखण, भरपूर पाणी पिणे, अतिथंड पदार्थ टाळणे, पौष्टिक आहार घेणे, आजारी व्यक्तीचा संपर्क टाळणे अशा बाबींवर लक्ष ठेवणे गरजेचे असते. व्हायरल फिव्हरवरील उपचार हे आजाराच्या लक्षणांवरून ठरविले जातात.

वातावरणातील बदलांमुळे व्हायरल फिव्हरचे रुग्ण वाढले. तापासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार करावा. स्वच्छता, पौष्टिक आहार, दूषित पदार्थाचे सेवन टाळणे, आजारी रुग्णांपासून दूर राहणे, अशी काळजी घेता येईल.
- पकंज दिवाण, वैद्यकीय अधिकारी, इर्विन रुग्णालय.

Web Title: 1 fever in July, 2 typhoid patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.