पथ्रोटजवळ अपघातात १ ठार, २७ जखमी

By admin | Published: September 10, 2015 12:06 AM2015-09-10T00:06:20+5:302015-09-10T00:06:20+5:30

दर्यापूर येथून मूग तोडण्यासाठी मजूर घेऊन जाणारे पीकअप वाहनाने एका दुचाकीला जोरदार धडक दिली.

1 killed, 27 injured in road accidents near Patrot | पथ्रोटजवळ अपघातात १ ठार, २७ जखमी

पथ्रोटजवळ अपघातात १ ठार, २७ जखमी

Next

दुचाकीवरील महिला दगावली : वाहनही उलटले, सर्व जखमी इर्विनमध्ये दाखल
पथ्रोट/अचलपूर : दर्यापूर येथून मूग तोडण्यासाठी मजूर घेऊन जाणारे पीकअप वाहनाने एका दुचाकीला जोरदार धडक दिली. यात एक महिला जागीच ठार झाली. त्यानंतर वाहनचालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहन उलटून २७ मजूर गंभीररीत्या जखमी झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी पथ्रोटनजीकच्या पाचआंबा शिवाराजवळ घडली. अपघातातील जखमींना इर्वीनमध्ये दाखल केले आहे.
वाहनचालक पसार
पथ्रोट/अचलपूर : अपघातातील सर्व जखमींना उपचारासाठी अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. घटना घडताच वाहनाचा चालक घटनास्थळाहून पळाला.
अपघातात मरण पावलेल्या महिलेचे नाव सुप्रिया संघपाल गावंडे (३२ रा. अंजनगाव) असे आहे. एम.एच. २७ के. ६११८पीकअप वाहन मजूर घेऊन वेगाने पाटाखेडा गावाकडे जात असताना या वाहनाची एम.एच. २७- ७३९७ या दुचाकीला धडक दिली. यात सुप्रिया संघपाल गावंडे या महिलेचा जागीच मृत्यू झाला. सोबत दुचाकी चालक रोहन पुंजालाल तेलमोरे (२९) हा सुध्दा गंभीर जखमी झाला.
सदर पिकअप वाहन दुचाकीला धडक दिल्यानंतर उलटल्याने यात पिकअपव्हॅनमधील २७ मजुर जखमी झाले.
जखमींमध्ये संध्या तुकाराम कास्देकर (२१), बालाजी भुसुमकर (४२), अजय पिलारी भुसुमकर (५०), सुधीया पुरखा भुसुमकर (२१), ममता शोभा बारस्कर (१९), चरखु पुरखा भुसुमकर (१९), समय रामचंद्र भुसुमकर (१५), रेखा रामचंद्र भुसूमकर (१५), टिंकी तुकाराम कास्देकर (१२), भुलाई छोटेलाल मावस्कर (२१) राजा छोटेलाल भुसूमकर (५), राहूल सिताराम भुसुमकर (१०), बुता पुरखा भुसुमकर आदींचा समावेश आहे. अपघातातील सर्व जखमींना उपचारासाठी पथ्रोट येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथमोपचार करुन पुढील उपचारासाठी अमरावती येथे रवाना करण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच पथ्रोट पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून घटनास्थळाचा पंचनामा केला. (वार्ताहर)

Web Title: 1 killed, 27 injured in road accidents near Patrot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.