१ लाख ७० हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात मदत जमा
By admin | Published: February 3, 2015 10:48 PM2015-02-03T22:48:14+5:302015-02-03T22:48:14+5:30
यंदा अल्प पाऊस पडला त्यामुळे खरीपाचे उत्पन्न पूर्णत: हातून गेले. त्यानंतर रब्बीचा पेराही घटला परिणामी १९७२ नंतर जिल्ह्यात सर्वात मोठा दुष्काळ पडला. शेतकरी आर्थिक अडचणीत आले.
अमरावती : यंदा अल्प पाऊस पडला त्यामुळे खरीपाचे उत्पन्न पूर्णत: हातून गेले. त्यानंतर रब्बीचा पेराही घटला परिणामी १९७२ नंतर जिल्ह्यात सर्वात मोठा दुष्काळ पडला. शेतकरी आर्थिक अडचणीत आले. पीडित शेतकऱ्यांना शासनाने आर्थिक मदत घोषित केली असून, जिल्ह्यातील १९८१ गावांमधील १ लाख ७० हजार शेतकऱ्यांना १२५ कोटी ७९ लाख रूपयांची मदत वितरित करण्यात आली आहे.
यावर्षी सोयाबीन, मूग, उडीद, ज्वारी, कापूस या पिकांचे उत्पन्न घटले, किडीचा प्रादूर्भाव आणि धुक्यामुळे कपाशी, तूर, हरभरा या पिकांना दगा दिला दरम्यान जो काही कापूस हाती आला त्याला अल्प भाव मिळत आहे. त्यातही गत वर्षीपेक्षा तब्बल १ हजार २०० रूपये भाव आहे. दुसरीकडे महागाई वाढत आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आले आहे.
त्यामुळे शासनाने सर्वेक्षण करून हेक्टरी ४ हजार ५०० रूपये आर्थिक मदत घोषित केली आहे. जिल्ह्यातील एकूण ७ लाख ५ हजार २६८ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात शासनाकडून ४० टक्के निधी मिळाला होता. त्यानुसार शेतकऱ्यांचे बँक खातेवर मदत जमा केली जात आहे. यासाठी राज्य शासनाने जिल्ह्याला १२५ कोटी ७९ लाख रूपयांचा निधी दिला आहे. १४ तालुक्यात मदत वाटपाचे काम सुरू आहे. लवकरच सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर मदत जमा होईल. (प्रतिनिधी)