१ लाख ९१ हजारांची वीजचोरी पकडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 04:16 AM2021-08-21T04:16:27+5:302021-08-21T04:16:27+5:30

पोलीस सुत्रांनुसार सुरेश चंदुमल पिंजानी (५५), अनिल चंदूमल पिंजानी (५०), गुरुमुख चंदुमल पिंजानी (४५, सर्व रा. विद्यानिवास गल्ली ...

1 lakh 91 thousand electricity theft caught | १ लाख ९१ हजारांची वीजचोरी पकडली

१ लाख ९१ हजारांची वीजचोरी पकडली

Next

पोलीस सुत्रांनुसार सुरेश चंदुमल पिंजानी (५५), अनिल चंदूमल पिंजानी (५०), गुरुमुख चंदुमल पिंजानी (४५, सर्व रा. विद्यानिवास गल्ली क्रमांक ३, रामपुरी कॅम्प) यांनी घरगुती वीज जोडणी असलेल्या मीटरमध्ये फेरफार केल्याचे महावितरणच्या पाहणीत आढळून आले. महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता श्रीकांत देशमुख यांच्या नेतृत्त्वाखालील भरारी पथकाने मीटर तपासणीदरम्यान ही वीजचोरी उघड केली. आरोपींनी वीज मीटर मंदगतीने चालवून ७,११० युनिट वापरल्याचे त्यांनी राजापेठ पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत नमूद केले. या वापरलेल्या विजेची रक्कम १ लाख ९१ हजार ५५० रुपये आहे. १० ऑगस्ट रोजी ही तपासणी करण्यात आली होती. त्यावरून श्रीकांत देशमुख यांनी १८ ऑगस्ट रोजी राजापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी कलम १३५ भारतीय विद्युत अधिनियम २००३ अन्वये गुन्हा नोंदविला आहे.

Web Title: 1 lakh 91 thousand electricity theft caught

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.