श्री गणेश मंडळाला १ लाखाचे बक्षीस
By admin | Published: April 13, 2017 12:09 AM2017-04-13T00:09:02+5:302017-04-13T00:09:02+5:30
शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्यावतीने सन- २०१६ च्या गणेशोत्सव दरम्यान सार्वजनिक गणेशोत्सव अभियानांतर्गत...
शासनाचा उपक्रम: ग्रामीणमध्ये १६ पारितोषिकांचे वितरण
अमरावती : शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्यावतीने सन- २०१६ च्या गणेशोत्सव दरम्यान सार्वजनिक गणेशोत्सव अभियानांतर्गत गणेश सजावट स्पर्धा, जिल्हा आणि तालुका स्तरावरील पारितोषिक प्राप्त गणेश मंडळास येथील टॉऊन हॉलमध्ये बुधवारी पारितोषिकांचे वितरण करण्यात आले.
यामध्ये जिल्हास्तरावरील प्रथम क्रमांकाचे एक लक्ष रुपयांचे पारितोषिक टोपेनगरातील श्री गणेशोत्सव मंडळाने पटकाविले. धनादेश, स्मृतीचिन्ह देऊन मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना गौरविण्यात आले. यावेळी व्यासपीठावर प्राचार्य दिलीप काळे, सांस्कृतिक कार्य विभागाच्या अधीक्षक अलका तेलंग, किरण पातुरकर आदी प्रामुख्याने उपस्थित होते. जिल्हास्तरावरील व्दितीय क्रमांकाचे ७५ हजाराचे पारितोषिक अचलपूर तालुक्यातील विनायकरपुरा येथील नागराज सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला मिळाले. तृतीय पारितोषिक श्री हनुमान व्यायाम शाळा गणेशोत्सव मंडळ, दर्यापुरने पटकाविले. त्यांना रोख ५० हजार रुपये बक्षीस देण्यात आले.
ग्रामीण भागातील ६ तालुक्यातील १६ गणेश मंडळाची निवड पुरस्कारासाठी करण्यात आली होतीे. यामध्ये प्रथम २५ हजार, व्दितीय १५ हजार, तृतीय १० हजारांचा धनादेश प्रशस्तीपत्र व स्मृतिचिन्ह असे स्वरुप होते. यामध्ये अचलपूर तालुक्यातील नागराज सार्वजनिक गणेश मंडळ, विनायकरपूरा प्रथम, लोकमान्य उत्सव समिती शिंदी बु.व्दितीय , अमरावती तालुक्यातील श्री गणेश मंडळ टोपेनगर प्रथम, बजरंग गणेशोत्सव मंडळ पटवीपुरा तर तृतीय श्री एकविरा युवक गणेशोत्सव मंडळ गौरक्षण चौक यांनी पटकाविले.
चांदूररेल्वे तालुक्यातून प्रथम पारितोषिक राजे छत्रपती गणेशोत्सव मंडळ सरदार चौक माळीपुरा, व्दितीय वीर संभाजी मंडळ, तर दर्यापूर तालुक्यातील श्री हनुमान व्यायाम शाळा गणेशोत्सव मंडळास प्रथम, युवा शिवशक्ती मंडळ व्दितीय, श्री गणेशा फांऊडेशन गांधी चौक येवदा तृतीय पुरस्काराने गौरविण्यात आले. तर मोर्शी तालुक्यातून प्रथम अभिमन्यू गणेशोत्सव मंडळ , व्दितीय सुर्योदय गणेशोत्सव मंडळ, तृतीय सत्संग गणेश मंडळ यांना बहाल करण्यात आले. नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील प्रथम शिवाई गणेशोत्सव मंडळ, व्दितीय एकलव्य गणेशोत्सव मंडळ, तृतीय गणपती संस्थान गणेशोत्सव मंडळ टाकळी (बु) मंडळाना पारितोषिकांचे वितरीत करण्यात आले. प्रास्ताविक अलका तेलंग यांनी तर संचालन पंकज ठाकूर यांनी केले. यावेळी गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची गर्दी मोठ्या संख्येने होती.