वृद्धाश्रमातील ३० ज्येष्ठ नागरिकांना चांगापूर देवस्थानात हलविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2019 01:34 AM2019-08-10T01:34:53+5:302019-08-10T01:35:33+5:30

वलगाव स्थित पेढी नदीच्या पाण्याची वाढती पातळी लक्षात घेता तेथील गाडगेबाबा वृद्धाश्रमातील ३० ज्येष्ठ नागरिकांना गुरुवारी रात्री चांगापूर देवस्थानात हलविण्यात आले. संततधार पावसामुळे नदी-नाले तुंडूब वाहत असल्यामुळे जलप्रलयाचे सकंटचे निर्माण होण्याची शक्यता आहे.

1 senior citizen of old age group shifted to Changapur temple | वृद्धाश्रमातील ३० ज्येष्ठ नागरिकांना चांगापूर देवस्थानात हलविले

वृद्धाश्रमातील ३० ज्येष्ठ नागरिकांना चांगापूर देवस्थानात हलविले

Next
ठळक मुद्देपेढी नदीच्या पुराचा धोका : गावांना सतर्कतेचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : वलगाव स्थित पेढी नदीच्या पाण्याची वाढती पातळी लक्षात घेता तेथील गाडगेबाबा वृद्धाश्रमातील ३० ज्येष्ठ नागरिकांना गुरुवारी रात्री चांगापूर देवस्थानात हलविण्यात आले. संततधार पावसामुळे नदी-नाले तुंडूब वाहत असल्यामुळे जलप्रलयाचे सकंटचे निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वृद्धाश्रमातील व्यवस्थापक अवकाश बोरशे यांनी वृद्धांना सुरक्षितस्थळी हलविले.
राज्यभरात पावसाचा अलर्ट जारी केल्यामुळे मुसळधार पाऊस व अतिवृष्टीचे शक्यता वर्तविाली आहे. पावसाचा अंदाज पाहता नदी-नालाकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशाराही जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आला आहे. त्या अनुषंगाने वलगाव स्थित पेढी नदीकाठावरील घरांना अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच गाडगेबाबा वृद्धाश्रमातील ३० वृद्धांना गुरुवारी रात्री चांगापूर मंदिरात हलविण्यात आले. वलगाव स्थित पेढी नदीतील पाण्यानेही दोन दिवसांपासून जोर धरला आहे. त्यातच चांदूर बाजार येथील विश्रोळी धरण फुल्ल भरल्याने एक तो दोन दिवसांत प्रशासनाकडून पेढी नदीत पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासन दिली आहे. त्यामुळे नदीकाठी असणाऱ्या गावाला सत्तरकतेचा इशारा रात्री देण्यात आला. त्यामुळे गुरुवारी रात्री वृद्धाश्रमाचे व्यवस्थापक अवकाश बोरशे यांनी रात्री ताबडतोब ३० वृद्धांना सुरक्षितस्थळी हलविले.
२००७ मध्ये वृद्धाश्रम गेले होते पाण्यात
२००७ मधील जोरदार पावसामुळे पेढी नदीला पूर आला होता. त्यावेळी नदीकाठी असणाऱ्यांना गावांमध्ये पाणी शिरले आणि अतोनात नुकसान झाले होते. त्यावेळी पेढी नदीच्या काठ्यावरच असणाºया गाडगेबाबा वृद्धाश्रमात पाणी शिरले होते. ते पाण्याखाली गेले होते.

Web Title: 1 senior citizen of old age group shifted to Changapur temple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.