१ हजार ७५८ तरुणांची स्वप्नपूर्तीसाठी दौड!

By admin | Published: March 30, 2016 12:39 AM2016-03-30T00:39:51+5:302016-03-30T00:39:51+5:30

पोलीस भरती प्रक्रियेला मंगळवार सकाळपासून सुरुवात झाली असून पहिल्या दिवशी शहर, ग्रामीण व एसआरपीएफच्या पोलीस ....

1 thousand 758 youths dream of dreaming! | १ हजार ७५८ तरुणांची स्वप्नपूर्तीसाठी दौड!

१ हजार ७५८ तरुणांची स्वप्नपूर्तीसाठी दौड!

Next

पोलीस भरतीला सुरुवात : धावताना पडल्याने युवकाचा पाय जायबंदी
अमरावती : पोलीस भरती प्रक्रियेला मंगळवार सकाळपासून सुरुवात झाली असून पहिल्या दिवशी शहर, ग्रामीण व एसआरपीएफच्या पोलीस पदभरतीत १ हजार ७८५ तरुणांनी स्वप्नपूर्तीसाठी दौड लावली. १०० मीटर धाव चाचणी दरम्यान परभणी जिल्ह्यातील युवक अचानक खाली कोसळल्याने त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली. तरुणाला उपचारकरिता तातडीने इर्विन रुग्णालयात पाठविण्यात आले.
अमरावती शहर पोलीस विभागातील ३१, ग्रामीण पोलीस विभागातील २७ तर एसआरपीएफमधील ४० जागांसाठी तब्बल ७ हजार ५७२ उमेदवारांनी अर्ज सादर केले आहेत.

परभणीच्या तरुणाच्या पायाला गंभीर दुखापत
पोलीस भरतीत १०० मीटर दौड चाचणीच्यावेळी सर्व तरुण धावत असताना अचानक केशव माधव दुगाने (२४, रा. कानेगाव, ता.सोनपथ, जिल्हा परभणी) हा तरुण खाली कोसळला. यात केशवच्या पायाचे हाड मोडले. ही बाब लक्षात येताच तत्काळ पोलिसांनी केशववर प्राथमिक उपचार सुरू केले. त्यानंतर त्याला रुग्णवाहिकेद्वारे इर्विन रुग्णालयात व नंतर खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

परीक्षार्थींना प्राधान्य
पोलीस भरती प्रक्रियेदरम्यान परीक्षार्थी उमेदवारांना प्राधान्य दिले जाणार आहे. मात्र, भरतीच्या तारखेमध्ये कोणताही बदल केला जाणार नसल्याचे पोलीस विभागाने सांगितले. ज्या विद्यार्थ्यांची परीक्षा पोलीस भरतीदरम्यान आहेत, त्यांनी आधीच पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क केल्यास त्या विद्यार्थ्यांना प्राधान्य देऊन त्यांची चाचणी परीक्षेच्या वेळेपूर्वीच घेतली जाईल किंवा परीक्षा संपल्यानंतरही चाचण्या घेतल्या जाणार आहेत. यामुळे परीक्षार्थ्यांचे नुकसान टळू शकेल. विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: 1 thousand 758 youths dream of dreaming!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.