बेलोरा विमानतळासमोर १० कार जळाल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2019 01:22 AM2019-04-29T01:22:52+5:302019-04-29T01:23:20+5:30
अकोला राष्ट्रीय महामार्गालगतच्या बेलारा विमानतळासमोरील वाहनांच्या स्टॉक यार्डला लागलेल्या आगीत १० कार जळून खाक झाल्या. ही घटना रविवारी पावणेसहा वाजताच्या सुमारास घडली. महापालिका अग्निशमन विभागाला आग नियंत्रणात आणण्यासाठी दीड तास शर्थीचे प्रयत्न करावे लागले.
अमरावती : अकोला राष्ट्रीय महामार्गालगतच्या बेलारा विमानतळासमोरील वाहनांच्या स्टॉक यार्डला लागलेल्या आगीत १० कार जळून खाक झाल्या. ही घटना रविवारी पावणेसहा वाजताच्या सुमारास घडली. महापालिका अग्निशमन विभागाला आग नियंत्रणात आणण्यासाठी दीड तास शर्थीचे प्रयत्न करावे लागले. या आगीत सुमारे ५० लाख रुपये किमतीच्या कार जळाल्या असाव्यात, असा अंदाज अग्निशमन विभागाने वर्तविला आहे.
प्राप्त माहितीनुसार, बेलोरा विमानतळाच्या समोरील भागात एका संकुलात नवीन, जुने वाहनांचे स्टॉक यार्ड आहे. यात अमरावतीच्या जायका मोटर्स आणि केतन मोटर्स या कार विक्रेत्याचे स्टॉक यार्ड असून, अचानक लागलेल्या आगीत १० कार जळाल्या. घटनेच्या वेळी यार्डात १०० वाहने होती. मात्र, समयसूचक तेने ही आग आटोक्यात आली. ही आग कशामुळे लागली, हे तूर्तास कळू शकले नाही. पोलीस आणि अग्निशमन विभागाच्या पंचनाम्याअंती आगीचे कारण स्पष्ट होईल, असे अग्निशन कर्मचारी विजय पंधरे यांनी सांगितले.
सायंकाळी ५.४५ वाजता लागलेली आग रात्री पावणेआठ वाजताच्या सुमारास तीन बंबाच्या साहाय्याने ंिनयंत्रणात आणली. या आगीमुळे बेलोरा गावात एकच खळबळ उडाली. ही आग नियंत्रणात आणण्यासाठी विजय पंधरे, नसीर अहमद, मनोज इंगोले, वैभव गजभारे, धनराज पांडे, ज्ञानेश्वर शेळके या कर्मचाऱ्यांनी मोलाची भूमिका बजावली.