अमरावती विभागात कर्जमाफी, प्रोत्साहन योजनेसाठी १० लाख शेतकरी पात्र; 7 लाख शेतकऱ्यांनी भरले ऑनलाइन अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2017 04:56 PM2017-09-05T16:56:02+5:302017-09-05T16:57:20+5:30

शासनाने थकबाकीदार शेतकऱ्यांचे दीड लाख मर्यादेतील कर्ज माफ केले आहे.

10 lakh farmers eligible for debt waiver, incentive scheme in Amravati division; Online application filled with 7 lakh farmers | अमरावती विभागात कर्जमाफी, प्रोत्साहन योजनेसाठी १० लाख शेतकरी पात्र; 7 लाख शेतकऱ्यांनी भरले ऑनलाइन अर्ज

अमरावती विभागात कर्जमाफी, प्रोत्साहन योजनेसाठी १० लाख शेतकरी पात्र; 7 लाख शेतकऱ्यांनी भरले ऑनलाइन अर्ज

Next
ठळक मुद्देशासनाने थकबाकीदार शेतकऱ्यांचे दीड लाख मर्यादेतील कर्ज माफ केले आहे. ‘छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजने’मध्ये ३ सप्टेंबरपर्यत अमरावती विभागातील पात्र १० लाख शेतकऱ्यांपैकी 6 लाख ६५ हजार ४६६ शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे. १५ तारखेच्या पात्र शेतकऱ्यांचे अर्ज भरणे शक्य नसल्याने योजनेला मुदतवाढ मिळणे महत्त्वाचे आहे. 

अमरावती, दि.5 - शासनाने थकबाकीदार शेतकऱ्यांचे दीड लाख मर्यादेतील कर्ज माफ केले आहे. यासाठीच्या ‘छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजने’मध्ये ३ सप्टेंबरपर्यत अमरावती विभागातील पात्र १० लाख शेतकऱ्यांपैकी 6 लाख ६५ हजार ४६६ शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे. यामध्ये चार लाख ७२ हजार ४१५ शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज भरले आहेत. मात्र, १५ तारखेच्या पात्र शेतकऱ्यांचे अर्ज भरणे शक्य नसल्याने योजनेला मुदतवाढ मिळणे महत्त्वाचे आहे. 

शासनाद्वारे जाहीर कर्जमाफी योजनेसाठी अमरावती विभागातील सात लाख ९७ हजार ५६३ थकबाकीदार  व चालू दोन लाख असे एकूण १० लाख  शेतकरी पात्र आहेत. शासनाद्वारे जाहीर अटी व शर्तींनुसार किमान दोन लाख शेतकऱ्यांना योजनेचा फायदा मिळू शकतो. यासाठी जिल्ह्यात २४ जुलैपासून सेतू, महाऑनलाईन, सीएससी व संग्राम केंद्रांवर कर्जमाफीचे ऑनलाईन अर्ज मोफत भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र, योजनेच्या सुरूवातीपासूनच जवळपास महिनाभर सर्व्हर डाऊनची समस्या, आधार सुविधा नसलेल्या शेतक-यांसाठी असणारे बायोमेट्रिक डिव्हाईस कनेक्ट न होने, नेट कनेक्टीव्हीटी नसणे, केंद्रचालकांचे शेतकऱ्यांना असहकार्य आदी कारणांमुळे कर्जमाफीच्या ऑनलाईन अर्ज प्रक्रियेचा बोजवारा उडाला.

विहित कालावधीत घट होत असल्याने शेतकऱ्यांची ई-सेवा केंद्रांवर मोठी गर्दी झाली. मात्र, सर्व्हर डाऊन असल्याने दिवसभरात अत्यल्प अर्ज भरले जात असल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. परिणामी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांसह विभागीय आयुक्तांनी केंद्रांना भेटी देवून 'आपले सरकार’ यापोर्टल संदर्भात सीएमओ कार्यालयासी थेट संपर्क साधल्याने दोन दिवसांपासून सर्व्हरचा वेग वाढला आहे. सुटीच्या दिवशीदेखील केंद्र सुरू ठेवण्याचे निर्देश केंद्रचालकांना दिल्यामुळे सद्यस्थितीत चार लाख ७२ हजार ४१५  अर्ज अपलोड करण्यात आले आहेत.

अर्ज प्रक्रियेत यवतमाळ जिल्हा आघाडीवर
विभागात २४ जुलैपासून ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरूवात झाली. ३ तारखेपर्यंत 6 लाख 64 हजार,466 शेतकऱ्यांनी नोंदणी केली. त्याच्या तुलनेत ४ लाख ७२ हजार ४१५ शेतक-यांनी ऑनलाईन अर्ज भरले आहेत. यामध्ये सर्वाधिक 1 लाख ५१ हजार 846 अर्ज यवतमाळ, ९५,७४० अमरावती, ५६,१२५ बुलडाणा, ९२,३६७ वाशिम व ७६,७४० अर्ज अकोला जिल्ह्यात भरले गेले आहेत. रविवारपर्यंत राज्यात ५९,५७,९९१ शेतकºयांनी नोंदणी केली तर ४९,२३,८६६ शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज भरले आहेत.

४.७२ लाख शेतकऱ्यांनी भरले ऑनलाईन अर्ज
विभागात सद्यस्थितीत चार लाख ७२ हजार ४१५ शेतकºयांनी आॅनलाईन अर्ज भरले आहेत. यामध्येही यवतमाळ जिल्हा आघाडीवर आहे. येथील १,५१,८४६ शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज भरले आहेत. अमरावती ९५,३३७, अकोला ७६,७४०, बुलडाणा ५६,१२५ तसेच वाशिम जिल्ह्यात  ९२,३४७ अर्ज ३ सप्टेबरपर्यंत भरण्यात आले आहेत.
 

Web Title: 10 lakh farmers eligible for debt waiver, incentive scheme in Amravati division; Online application filled with 7 lakh farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी