मूलभूत निधीतून प्रत्येक नगरसेवकांना १० लाख
By Admin | Published: January 20, 2016 12:35 AM2016-01-20T00:35:32+5:302016-01-20T00:35:32+5:30
मुलभूत सोईसुविधांच्या विकास योजनेतून प्रत्येक नगरसेवकांना १० लाख रुपयांचा निधी देण्याचा निर्णय मंगळवारी महापौर चरणजितकौर नंदा यांनी घेतला.
१० कोटींचे इस्टीमेट : विभागीय आयुक्तांना यादी होणार सादर
अमरावती : मुलभूत सोईसुविधांच्या विकास योजनेतून प्रत्येक नगरसेवकांना १० लाख रुपयांचा निधी देण्याचा निर्णय मंगळवारी महापौर चरणजितकौर नंदा यांनी घेतला. विकास कामांच्या यादीला येत्या आमसभेत मान्यता प्रदान करुन ही यादी विभागीय आयुक्तांच्या निर्णयासाठी पाठविले जाणार असे स्पष्ट करण्यात आले.
शासनाकडून आलेल्या पत्राचा आधार घेत सभागृहात हा विषय चर्चिल्या जात असताना पाच कोटी रुपयांचे अनुदान मिळणार आहे. तितकाच निधी पाच कोटी रुपये महापालिका प्रशासनाला समाविष्ट करुन एकूण १० कोटी रुपयांची विकास कामे मंजूर करावी लागेल, ही बाब प्रशासनाने स्पष्ट केली. समान निधी वाटपाचा निर्णय महापौरांनी घेतल्यामुळे सदस्यांनी समाधान व्यक्त केले आहे. नगरसेवकांनी विकास कामांची यादी सादर केल्यानंतर इस्टिमेट तयार करणार असे प्रशासनाने सांगितले. शासन निर्णयानुसार निधी वाटपाचे धोरण अवलंबविले जाणार असल्याचे स्पष्ट केले. दरम्यान आयुक्त गुडेवार यांनी विकासकामांच्या यादीला सभागृहात मान्यता देवू, हे आवर्जून सांगितले. (प्रतिनिधी)