अनुकंपाधारकांसाठी १० टक्के जागा आरक्षित

By admin | Published: May 5, 2017 12:26 AM2017-05-05T00:26:44+5:302017-05-05T00:26:44+5:30

स्थानिक स्वराज्य संस्थांसह अन्य शासकीय संस्थांमध्ये प्रतिवर्षी रिक्त होणाऱ्या पदांच्या तुलनेत १० टक्के जागा

10 percent seats reserved for the compassionate | अनुकंपाधारकांसाठी १० टक्के जागा आरक्षित

अनुकंपाधारकांसाठी १० टक्के जागा आरक्षित

Next


अमरावती : स्थानिक स्वराज्य संस्थांसह अन्य शासकीय संस्थांमध्ये प्रतिवर्षी रिक्त होणाऱ्या पदांच्या तुलनेत १० टक्के जागा अनुकंपाधारकांसाठी आरक्षित राहणार आहेत. १ मार्च २०१४ च्या शासन निर्णयान्वये अनुकंपातत्त्वावरील नियुक्तीसाठी प्रतिवर्षी रिक्त होणाऱ्या पदाच्या १० टक्क्यांची असलेली मर्यादा १ मार्च २०१७ पासून पुढे २८ फेब्रुवारी २०१९ पर्यंत चालू राहील.

शासकीय कर्मचाऱ्याच्या आकस्मिक निधनानंतर व संबंधित कर्मचारी बेपत्ता झाल्याच्या पार्श्वभूमिसह अन्य काही अटी-शर्तीनुसार संबंधिताच्या कुटुंबातील एका सदस्याला अनुकंपा तत्त्वावर शासकीय नोकरीत सामावून घेतले जाते.

अनुकंपा तत्त्वावरील नियुक्तीसाठी गट ‘क’ आणि ‘ड’ मध्ये प्रतिवर्षी रिक्त होणाऱ्या पदांच्या ५ टक्के पदांची मर्यादा २२ आॅगस्ट २०१५ च्या शासन निर्णयान्वये विहित करण्यात आली. ५ टक्क्यांची ही मर्यादा वाढवून ती एक वर्षासाठी १० टक्के अशी करण्यात आली आहे. त्याबाबतचा निर्णय १ मार्च २०१४ ला घेण्यात आला. सोबतच पदभरतीवर निर्बंध असेपर्यंत गट ‘क’ व गट ‘ड’ संवर्गातील रिक्त जागा एका वर्षात भरण्यास मान्यता असलेल्या रिक्त पदांच्या १० टक्के पदे ही अनुकंपा तत्वावर भरण्याबाबत निर्णय मे आणि सप्टेंबर २०१५ मध्ये घेतला होता. त्याअनुषंगाने ३ मे २०१७ रोजी काढलेल्या शासन निर्णयाने त्याला मुदतवाढ देण्यात आली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: 10 percent seats reserved for the compassionate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.